पत्रकारांनीही समाजातील खरे वास्तव मांडून निर्भीड पत्रकारितेतून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करावा.. श्वेता चौगले.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : समाज प्रबोधन करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांमुळे खऱ्या अर्थाने पत्रकारतेची मुहूर्तमेढ रोवली, त्यांनी निर्भीड आणि निस्वार्थ भावनेने समाजातील वास्तव मांडले, आजच्या पत्रकारांनीही समाजातील खरे वास्तव मांडून निर्भीड पत्रकारितेतून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करावा असे आवाहन डिजिटल मीडियाच्या राज्य सदस्य श्वेता चौगले  यांनी आव्हान केले. डिजिटल मीडियाच्या वतीने शुक्रवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी श्वेता चौगले  बोलत होत्या.

कार्यक्रमाची सुरवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. 

श्वेता चौगले  पुढे म्हणाल्या की  पन्नास वर्षापुर्वी या देशात ब्रिटीशांची जुलमी राजवट सुरु होती, मात्र त्यांच्या या जुलमी राजवटीच्या विरोधात बाळशास्त्री जांभेकर यांनी आवाज उठवत आपल्या दपर्ण या दैनिकातून समाज प्रबोधनाचे काम केले. त्यांनी सामाजिक परिस्थिती जाणून समाज्यातील अन्यायाविरोधात वाचा फोडण्याचे काम केले, त्यांनी निर्भीड आणि निस्वार्थ भावनेने वास्तव मांडले. आजही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराकडून आपल्या लेखणीतून समाज प्रबोधन होत आहे ते अधिकाधिक अजून धारधार व्हावे.

सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तात्रय मांजरेकर  म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ खऱ्या अर्थाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी जगासमोर आणला. त्यांनी ब्रिटिश राजवटीमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही जागवली जांभेकर  यांनी जो पायंडा घालून दिला तो आजही इथला पत्रकार जपला आहे. 

डिजिटल मीडियाचे राज्य उपाध्यक्ष म्हणाले की , इंग्रजांच्या काळात दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी  इंग्रजांच्या जुलमी राजवटीला समाजासमोर आणले एक अभ्यासू  व्यक्तिमत्व असलेल्या जांभेकर यांचे मराठी भाषेवरही चांगले प्रभुत्व होते आज त्यांचाच वारसा पुढे घेऊन समाजातील पत्रकार अन्याय अत्याचारावर वाचा पडत आहेत  भविष्यात त्यांचे हे काम अधिक वेगाने होत जावो अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला शोभा वसवाडे ,  पश्चिम महाराष्ट्र लोकक्रांती विकास आघाडी अध्यक्ष दत्तात्रय गोडबोले , लोक्रांती विकास आघाडी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष दिलीप रेपे ,  लोकक्रांती महाराष्ट्र तालुका अध्यक्ष सुनील मुदगल ,  वधू वर सूचक राजू शेख कलाकार संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुद्ध बडवे , वधू वर सूचक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व पत्रकार मोठ्या संख्येने  हजर होते

 डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष सखाराम जाधव कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष वसंतराव पाटील राज्य सदस्या मोनिका जाधव वाहातुक सेनेचे उपाध्यक्ष अनवर मुल्ला,गायीका सिमा भंडारे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी दत्तात्रेय मांजरे यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली

Post a Comment

Previous Post Next Post