न्यू मार्शल आर्ट क्लासेसच्या वतीने ज्युनिअर कराटे बेल्ट परीक्षा उत्साहात


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी :

येथील न्यू मार्शल आर्ट क्लासेसच्या वतीने ज्युनिअर कराटे बेल्ट परीक्षा उत्साहात पार पडली.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक शहर उपाध्यक्ष उत्तम चौगुले यांच्या हस्ते उत्तीर्ण खेळाडूंना प्रमाणपञ व बेल्टचे वितरण करुन सन्मानित करण्यात आले. 

प्रारंभी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेला मुला - मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


यावेळी प्रमुख पाहुणे उत्तम चौगुलेयांच्या हस्ते कराटे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना प्रमाणपञ व बेल्टचे वितरण केले.

उत्तम चौगुले यांनी मुलांनी कराटेचे शास्ञशुध्द प्रशिक्षण घेऊन स्वतःबरोबर संकटात सापडलेल्या लोकांचे संरक्षण करावे.तसेच कराटे कलेचा समाजहितासाठी उपयोग करुन इतरांसमोर आदर्श निर्माण करावा ,असे आवाहन केले.यावेळी ग्रॅन्ड मास्टर महेश मुतालिक यांना मुलांना कराटे खेळाचे प्रशिक्षण घेऊन स्व - संरक्षणाची गरज विविध उदाहरणांव्दारे पटवून सांगितली.

यावेळी यलो बेल्ट स्वरांजली मकोटे ,ञिशा ऐतवडे ,मनस्वी शेंडगे , ऑरेंज बेल्ट राजवीर सुतार ,यश कांबळे ,अथर्व कांबळे , समीर पडियार , आराध्य शेंडगे, ग्रीन बेल्ट विराज रायकर ,चिन्मय कडोलकर , संग्राम जाधव , चिदानंद कडोलकर ,दिव्याराणी दत्तवाडे ,आराध्या ढवळे ,ब्लू बेल्ट राजवीर पाटील ,शुभ्रा खाडे ,ऋषील कबाडे ,देवांश पाखरे ,देवांश दुधाणे ,समर्थ मुळीक , आयुष नलवडे ,अलोक नलवडे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी निशांत कोष्टी ,अक्षय डवरी , आदर्श पाटील ,श्रेयश मुतालिक यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी मुले - मुली यांच्यासह पालक , प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post