इचलकरंजी येथील श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी  :  इचलकरंजी  येथील श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने गणेश जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार (ता.१९) ते शुक्रवार (ता.२७) या कालावधीत सामुदायिक ज्ञानेश्‍वरी पारायण, भजन यासह विविध कार्यक्रम होणार आहेत. गुरूवारी सकाळी आठ वाजता उत्सव मूर्तीचे पूजन माजी नगराध्यक्षा ॲड. सौ. अलका स्वामी तर ज्ञानेश्‍वरी पारायणाचा शुभारंभ नटवरलालजी बांगड यांच्या हस्ते होणार आहे. गणेश जयंती उत्सवाचे यंदाचे हे ३० वे वर्ष आहे.

जयंती कालावधीत दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत ज्ञानेश्‍वरी पारायण होणार आहे. पारायणाचे व्यासपीठ प्रमुख ह.भ.प. सदाशिव दुंडाप्पा उपासे महाराज असतील. तसेच दुपारी चार ते सात या वेळेत विविध महिला भजनी मंडळांचे भजन आयोजीत केले आहे. बुधवारी (ता.२५) सकाळी १० वाजता सौ. अंजली साने, चिपळूण यांचे गणेश जन्माचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता श्रींचा जन्मकाळ त्यानंतर सायंकाळी पाच वाजता श्री सप्तश्रृंगी महिला भजनी मंडळाचे भजन, साडेसहा वाजता दिपोत्सव आणि सायंकाळी सात वाजता महाआरती होणार आहे. गुरूवारी (ता.२६) ज्ञानेश्‍वरी पारायण व बाल अवधुत भजनी मंडळ यांचे भजन होईल. शुक्रवारी (ता.२७) सकाळी ११ वाजता महाप्रसादाने जयंती उत्सवाची सांगता होणार आहे. हे सर्व कार्यक्रम पंचगंगा नदी किनारी येथे होतील. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भक्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post