सांगून गेले मला भीमराव !


प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगून गेले मला भीमराव ! 

लेख.    राहुल सोनोने (मळसुर) : 7823013331

        साहित्यरत्न यांनी सांगितलंच आहे."जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मला भीमराव"आजच्या दिवशी हे शीर्षक योग्यच.

   6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस.प्रथम भारतरत्न,मार्गदर्शक,श्रेष्ठ ग्रंथ लेखक,कृतीचा कर्मप्रेरक,विक्रमी अभ्यासक,उच्च पदव्यांचा साधक,न्यायासाठी कर्तव्यदक्ष कार्यकुशक,लोकशाहीचा लोकहित महानायक,अपेक्षांचा उद्धारक,शोषितांचा उत्तम संघटक,रुढींचा विधायक विध्वसंक,दलितांचा कैवारी,धर्मप्रिय सदाचरणी,दलितांचा भाग्यविधाता,लोकशाहीचा कट्टरपुरुशकर्ता,देशाचा भारत रत्न,घटनेचा शिल्परत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

    "जगातली देखणी,मी भीमाची लेखणी" वामन दादा म्हणतात ते अगदी खरं आहे.समाजात पेन घेऊन मिरवण्याची मुभा नव्हती त्याच लेखणीने आज देश चालतो.मग का ओ ती लेखणी देखणी नसू नये.त्या लेखणी मुळं फाटक्या कपड्यातून  आज समाज सूटा बुटात आला.त्या लेखणी मूळ बैलगाडी नशिबी नव्हती आज विमानाच्या स्वाऱ्या समाज दणक्यात करतोय.का ती लेखणी देखणी नसू नये? बाबांचे उपकार किती?  संपायचे नाहीत

       जीवनात किती संघर्ष आला तरी माणसाने पुढं च कूच केली पाहिजे.संघर्ष केला तरच क्रांती होते.मग ते महाडचे चौदारतळे चळवळ असो कि काळाराम मंदिर चळवळ  असो.शिक्षण खूप महत्वाची बाजू आहे.बाबासाहेबांना चांगलंच ठाऊक.क्रांती घडवाची असेल समाज चांगला शिकला पाहिजे,विषमता संपली पाहिजे.त्यासाठी त्यांनी शिक्षण हेच आपलं शत्र म्हणत.त्यात ते पारंगत झाले.ती सुरुवात चौथी पास मग पुढं मॅट्रिक ची परीक्षा.दलित विद्यार्थी मध्ये पहिला मॅट्रिक पास करणारा विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर.त्यांच्या मार्गदर्शकांनी त्यांना बुद्धचरित्र भेट म्हणून दिले होते.मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी मागे पहिलेच नाही.BA,MA,MS,Doctorates in Philosophy,Bar At Law,D-Sc परीक्षा उत्तीर्ण झाले व पदव्या हासील केल्या.

      उद्धारासाठी गोलमेज परिषद हि गाजवली.दलित न्यायासाठी हक्काच्या बाजू मांडल्या.काही अंशी त्या मागण्या मान्य हि झाल्या.त्या नंतर ऐतिहासिक"पुना करार" नावारूपाला आला.देशाच्या राजकारणाला वळण देणारा करार उदयास आला.

1920 च्या परिषद मध्ये शाहू महाराज म्हणले होते" दलितांचा महान नेता म्हणजे बाबासाहेब....." ते आज किती योग्य होत ते दिसून येतंय.

  पुन्हा एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.न्याय हक्कासाठी,एकता-समता टिकवण्यासाठी,संविधान वाचवण्यासाठी,मनूला हटवण्यासाठी कटीबद्ध राहू.

"उद्धरली कोटी कुळे,भीमा तुझ्या जन्मामुळे"

Post a Comment

Previous Post Next Post