कर्नाटक आणि महाराष्ट्र दोघांनी समन्वयांना हा प्रश्न सोडवला पाहिजे...... चंद्रकांत पाटील

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे:

कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सीमावाद शिगेला पोहोचला आहे. त्याबाबत बोलताना भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मी आणि शंभूराजे यांनी तासभर दिल्लीतील वकिलांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. ही केस ताकतीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. हा दोन राष्ट्रांच्या संघर्षाचा विषय नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र दोघांनी समन्वयांना हा प्रश्न सोडवला पाहिजे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या वक्तव्यांवरून सुरु असलेल्या वादावर सावध प्रतिक्रिया दिली.

जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींची निवडणूक भाजप, ताराराणी आघाडी, ताराराणी पक्ष, जनसुराज्य पक्ष आणि प्रकाश आवाडे एकत्रित लढवणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. बैठकीत 300 पेक्षा जास्त गावांमध्ये थेट सरपंच व्हावा, यादृष्टीने बैठक झाल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल अवमान केल्याने राज्यात संतप्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री पाटील म्हणाले, कीराज्यपालांच्या मनात तशा भावना नसतील. म्हणून मी सकारात्मकपणे या विषयावर पडदा टाकण्याबाबत हात जोडून विनंती उदयनराजे भोसले यांना केली होती. उदयनराजे काही बोलले असतील, तर त्यावर मी बोलणार नाही. राज्यपालांच्या कारवाई संदर्भात केंद्राच्या निर्णयाबद्दल बोलण्याइतपतही मी मोठा नसल्याचे सांगत पाटील यांनी अधिक प्रतिक्रिया देणे  टाळले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर उपस्थित  होते.

Post a Comment

Previous Post Next Post