अल्लाह भागवान यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली हे आमचे भाग्य आहे- दिगंबर नाना

हिंदु बांधवाचे एकतेचे दर्शन इज्तेमासाठी दिली जागा 

औरंगाबाद येथील साजीद मौलाना यांनी केले  हिंदू बांधवाचे  अभिनंदन 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

औरंगाबाद (प्रतिनिधी ) : 

अल्लाह भागवान यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली हे आमचे भाग्य आहे.सर्व धर्म एक  आहे कोणताही धर्म सांगत नाही आपआपसात वैर  राखणे तसेच चितेगांवला एक भाग्य लाभले आहे. आम्हा सर्व समस्त गावकऱ्यांना  सेवा करण्याचे पुण्य लाभले आहे दिगंबर नाना यांनी यावेळी आपली भावना व्यक्त केली आहे.

येथील चितेगांव जवळ होत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यासाठी इज्तेमाची तयारी सुरू असून मोठा असा भव्य जागाची आवश्यकता असते दर वर्षी इज्तेमा होत आहे.औ.रंगाबाद येथून चितेगांव जवळ दोन दिवसीय इज्तेमा होत आहे.10 व 11 डिसेंबरला होत आहे.इज्तेमासाठी येथील हिंदू बांधवांनी आपली जमीन जागा मुस्लिम बांधवांना इज्तेमासाठी दिली आहे.

औरंगाबाद येथील समाजसेवक  साजीद मौलाना यांनी येथील हिंदू बांधवांचे शाल हार घालून अभिनंदन केले आहे.तसेच येथील हिंदू बांधवांनी होत असलेल्या इज्तेमासाठी जेवढी मदत लागत असेल आम्ही समस्त गांवकरी तयार आहोत तसेच दरवर्षी हे इज्तेमा आमच्या गावात व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती सय्यद साबेर (भ्रष्टाचार विरोधी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष,) बसेश्वर नजन, वाहेद शेख,कृष्णा गिधाणे,समशेर पठाण,तुळशिराम गिधाणे, पाटील,दिगंबर शेठे,राष्ट्रावादी काँग्रेसचे जावेद खान,आबासाहेब रामराव गिधाणे,अब्दुल कदीर, हुसैनी मौलाना,ईस्माइल मामा,याकुब भाई,सय्यद सलीम, सरपंच उपसरपंच आदींची मुख्य उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post