पनवेल को. ऑपरेटिव्ह अर्बन बॅंक पंचवार्षिक निवडणूकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने भाजप प्रणित उत्कर्ष पॅनेलचा दारूण पराभव केला.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

सुनील पाटील : 

द पनवेल को. ऑपरेटिव्ह अर्बन बॅंक पंचवार्षिक निवडणूकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने भाजप प्रणित उत्कर्ष पॅनेलचा दारूण पराभव केला आहे. सहकार पॅनेलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत .2022 ते 2027 पाच वर्षांसाठी ही निवडणुक झाली आहे. या आधीही 2015 साली सहकार पॅनलचा विजय झाला होता. दरम्यान, पनवेल बॅंकेवर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाल्याने आता आगामी महापालिका निवडणुकींची चुरस चांगलीच वाढणार आहे.

या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 27) मतदान झाले तर सोमवार (दि. 28) मतमोजणी झाली. यावेळी 50 टक्के मतदान झाले असून 7070 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

हे आहेत विजयी उमेदवार –

जनार्दन पांडुरंग पाटील, बळीराम परशुराम म्हात्रे, दिलीप शंकरराव कदम, अनिल जनार्दन केणी, ज्ञानेश्वर धोंडु बडे, हितेन बिहारीलाल शहा, प्रविण पोपटराव जाधव, राजेश लक्ष्मण खानावकर, अरविंद महादेव सावळेकर, पांडुरंग बंडू भागिवंत, बाबुराव हरी पालकर, विमल मल्लिनाथ गायकवाड, विद्या भास्कर चव्हाण, हे उमेदवार विजयी झाले आहेत.

“महाविकास आघाडीचाच विजय होणार हे निश्चित होते. मतदारांनी आघाडीवर विश्वास दाखवून आम्हाला विजयी केले. मतदारांनी आम्हाला पुन्हा एकदा त्यांच्या सेवेची संधी दिली आहे.” – जनार्दन पाटील, विजयी उमेदवार

Post a Comment

Previous Post Next Post