किराडपुरा वार्डात विकास कामांचे उद्घाटन, हाजी इसाक खान यांच्या प्रयत्नामुळे यश...

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद, दि.5 (प्रतिनिधी) :

वार्ड क्रं.42, किराडपुरा येथे आज सकाळी 11 वाजता एमआयएमच्या नेत्यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. हाजी इसाक खान यांच्या प्रयत्नामुळे वार्डात नगरसेवक नसताना विकासकामे थांबलेली नाही. मनपा प्रशासनाकडे नागरीकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली प्रमाणिक प्रयत्न करत असल्याने नागरीक खुश आहेत.

प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांच्या प्रमुख उपस्थितीत गल्ली नंबर 14, बरकत किराणा ते रऊफ किराणा दुकानापर्यंत सिमेंट काँक्रीटचे रोड, अरफात मस्जिद ते रोशन मस्जिद ते पटेल हाॅटेल पर्यंत नविन ड्रेनिजलाईन टाकण्याचे शुभारंभ करण्यात आला.

यावेळी एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी, जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, मा.नगरसेवक अयूब जागिरदार, शेख अहेमद, हाजी इमरान, हाजी मतीन, फाहत भाई, मुस्तफा भाई, निसार भाई, जमील भाई, अहेमद भाई, वसिम पठाण, शेख आसिफ व वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post