निलेश माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख : 

पुणे : मनसेचे पुणे जिल्हा माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची गेल्याच महिन्यात माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशनानंतर ही हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, या हकालपट्टीनंतर माझिरे यांनी आता थेट पक्षालाच अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. विशेष म्हणजे मनसे नेते वसंत मोरे यांचे खंदे शिलेदार असलेल्या माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पुणे मनसेला मोठा हादरा बसला आहे.अखेर मनसे नेते वसंत मोरे यांचे निकटवर्तीय निलेश माझिरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. 28 नोव्हेंबर रोजी निलेश माझिरे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. निलेश माझिरे हे मनसेच्या पुणे जिल्हा माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते. या हकालपट्टीमुळेच निलेश माझिरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझिरे यांच्या 400 कार्यकर्त्यांनी देखील मनसेचा राजीनामा दिला आहे.

माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने ऐन महापालिकेच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. माझिरे यांची हकालपट्टी आणि राजीनामा यामुळे पुणे मनसेत काहीच अलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post