विंधणे वाडीवर उभारले ग्राम शिक्षा केंद्र



प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

    रायगड जिल्ह्यातील  उरण  तालुक्यातील अतिदुर्गम भाग व निसर्गाच्या सानिध्यात आलेले गाव म्हणजे विंधनेवाडी .या ठिकाणी   प्रथम एज्युकेशन फाउंडेशन  आणि विंधणेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर २०२२ रोजी ग्राम शिक्षा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. 

 स्त्री शिक्षणासाठी समानता , स्त्री शिक्षणासाठी आग्रही असणारे व सत्यासाठी देह झिजवणारे सत्यशोधक, कांतीसूर्य  महात्मा जोतिबाफुले यांच्या  पुण्यतिथी निमित्त  विंधनेवाडी येथे ग्राम शिक्षा केंद्र स्थापन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे ग्राम पंचायत समिती मधील सदस्य  दीपक कातकारी, सारडे विकास मंच व ऑक्सिजन पार्क चे आध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर, आवरे गावचे आदर्श शिक्षक व सुयश क्लासेस चे निर्माते  निवास गावंड सर, शिवप्रतिष्ठान चे प्रतिनिधी अक्षय कोळी सर, विंधनेवडी शाळेचे मुख्याध्यापक  संदीप पाटील सर, सहशिक्षक  चौघलेसर शाळा कमिटी सदस्य  सुनंदाताई वाघमारे , शिक्षण प्रेमी प्रतिश कातकरी, ॳकुश वाघमारे ॳगणवाडी सेविका  स्नेहाताई पाटील व प्रथम उरण तालुका प्रमुख    रणिता ठाकुर मॅडम  तसेच प्रथम टीम सुनिता पाटील, प्रेरणा ठाकूर, सोनाली म्हात्रे, काशीराम निरगुडे ‌व पुर्ण वाडीवरील माता पालक उपस्थीत होते. 

               कार्यक्रमाचे सुरुवात वाढीवरून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीत वाचाल तर वाचाल ,ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा ,अशा घोषणा देत गावातून  रॅली काढण्यात आली. यात गावकऱ्यांनी ही त्यांच्याजवळ असलेली पुस्तके देण्यात आली.शाळेतील मुख्याध्यापक संदीप सर व ऑक्सिजन पार्क चे  नागेंद्र सर यांच्याकडून पुस्तके देण्यात आली.  आणि नंतर कार्यक्रमाचे उद्घाटक नागेंद्र सर यांच्याकडून करण्यात आले आणि श्रींची प्रतिमा पूजन आणि नारळ वाढवण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उरण तालुकाप्रमुख रणिता ठाकूर यांनी केले आणि नंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांनी गावकऱ्यांना आणि मुलांना पुस्तकांचे महत्त्व पटवून दिले आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गोडी यावी म्हणून सिद्धेश पाटील सारडे यांच्याकडून मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या ग्राम शिक्षक केंद्रासाठी आकाश फाउंडेशन मुंबईतर्फे वाडीवरील मुलांना बसण्यासाठी सतरंज्याही देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागेंद्र म्हात्रे सरांनी केले.

    मोठया उत्साहाने व आनंदाने वाडीवरच्या माता पालकांच्या आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत ग्राम शिक्षा केंद्र स्थापन करण्यात आले . सर्व माता पालकांना आनंद झाला नवनवीन पुस्तके आम्हाला व आमच्या मुलांना वाचायला मिळणार म्हणून त्यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे खूप खूप आभार मानले.कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे  भोजराज क्षीरसागर प्रथम कोकण झोन प्रोग्राम हेड यांचे खूप खूप धन्यवाद.

Post a Comment

Previous Post Next Post