शहराच्या पश्‍चिम भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महापालिकेकडून येत्या गुरूवारी ( दि. 10) रोजी वारजे जलकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गांधी भवन पाण्याची टाकी तसेच चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहीनीला फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे.त्यामुळे, येत्या बुधवारी रात्री पासून गुरूवारी रात्री पर्यंत शहराच्या पश्‍चिम भागातील कोथरूड, बावधन, वारजे, कर्वेनगर,बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, तसेच औंधच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी ( दि.11) रोजी उशीराने तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गांधी भवन टाकी परिसर ( बुधवारी रात्री 10 ते गुरूवारी रात्री 10) : कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्ह्यू, गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुल नगर, बी. एस. यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क- 1, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, आर्चिड लेन 7 व 9 . मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर.

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर ( बुधवारी रात्री 10 ते गुरूवारी रात्री 10): पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सॅटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी, चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क,शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर इत्यादी.पॅन कार्ड क्‍लब GSR टाकी परिसर :- बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्‍लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर इ.

Post a Comment

Previous Post Next Post