गद्दार अब्दुल सत्तार यांना सत्तेचा माज चढलाय त्यांना....रमेश थोरात


प्रेस मीडिया लाईव्ह :

यवत : ( पुणे )  राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. त्यावरून राज्यभरातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यभरातून सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ठिकाठिकाणी आंदोलन करून सत्तार यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात येत आहेत.

दरम्यान, दौंडचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक रमेश थोरात यांनी तीव्र शब्दात सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. सार्वजनिक जीवनात स्वतःला सिद्ध केलेल्या सुप्रियाताई सुळे यांना अनेक मार्गाने कमी लेखण्याची अब्दुल सत्तार यांची ही वृत्ती अत्यंत निंदनीय तसेच खालच्या पातळीची आहे, गद्दार अब्दुल सत्तार यांना सत्तेचा माज चढलाय त्यांना जोड्याने मारले पाहिजे, असे म्हणत थोरात यांनी सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post