हडपसर पोलीसांची धडक कारवाई,२२ लाखांचा मुद्देमाल जप्त, पुणे शहरातील मोबाईल शॉपी फोडीचे ५ गुन्हे उघड सराईत



प्रेस मीडिया लाईव्ह :

जब्बार मुलाणी

हडपसर पुणे - ऊरळी देवाची ता.हवेली जि-पुणे येथील स्वप्नील सुभाष परमाळे यांच्या न्यु साई मोबाईल दुकानाचे शटर तोडून आतील १९ लाख रुपयांचे १०२ मोबाईल चोरी झालेचा हडपसर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला.

दुकानामध्ये असणारे सीसीटीव्ही तसेच दुकानाच्या बाहेरील बाजुस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून अनोळखी आरोपी व त्यांनी वापर केलेले चारचाकी वाहनाबाबत पोलीस अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधरकर यांना मिळालेल्या बातमीवरून सदर ठिकाणी जावून साहिल अनिल मोरे वय २० वर्षे रा. देशमुखवाडी, इंगळे कॉर्नर, शिवणे, पुणे. यास डुक्करखिंड, पुणे येथे एम.एच. १२ सी. के. ४२३६ या टाटा इंडिगो वाहनास ताब्यात घेतले. त्यास पोउपनिरी अविनाश शिंदे यांनी पोलीस कस्टडीत विचारपुस करुन गुन्हयातील साथीदार संकेत निवगुणे, लक्ष्मण ऊर्फ आण्णा जाधव, संतोष मोरे, गजानन मोरे, पोपट धावडे यांची नावे निष्पन्न केली.

पोलीस कस्टडीतील चौकशीत आणखी एक आरोपी संकेत प्रकाश निवगुणे वय २२ वर्ष रा. बानगुडे चाळ, संघर्ष चांक, यशोदिप सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे. यास ताब्यात घेऊन सदर गुन्हयातील सुत्रधार लक्ष्मण आण्णा जाधव हा चोरीतील मालासह एकमा पोलीस स्टेशन, जिल्हा, छपरा बिहार मधील एका गावात असल्याची शक्यता वाटल्याने वरीष्ठांच्या परवानगीने तपासपथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, अंमलदार शाहीद शेख, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे यांना तात्काळ रवाना करण्यात आले.

तसेच तपास पथकामधील सपोनि विजयकुमार शिंदे व पोना, संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच आधारे मुद्देमालाची विल्हेवाट लावणारा आरोपी मोनुसिंग रा. विश्णपुरा काला, थाना एकमा, जिल्हा सारण छप्रा, राज्य बिहार याचे बिहार मधील राहते घरी हडपसर पोलीसांनी छापा मारला असता सराईत आरोपी लक्ष्मण आण्णा जाधव रा. हॅप्पी कॉलनी, लेन नंबर ३, गोसावी वस्ती, कोथरुड पुणे. हा सदर ठिकाणी गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी ९७ मोबाईलसह ताब्यात घेतले. त्यास गुन्हयामध्ये तीनही आरोपी पोलीस कस्टडीत असुन अद्याप पर्यंत निष्पन्न हकीकत अशी की, पाहीजे आरोपी साहिल मोरे, गजानन मोरे, प्रभात मोरे, पोपट धावडे यांनी मिळून हडपसर, कोंढवा, धायरी, चतुःश्रुंगी या भागातील मोबाईलची दुकाने फोडून मोबाईल लक्ष्मण आण्णा जाधव यास देत होते. सदरचे मोबाईल हे लक्ष्मण आण्णा जाधव त्याचा साथीदार मोनु सिंग रा. बिहार यास विकत होता. मोबाईल विकून आल्यानंतर मोबाईलच्या किंमतीच्या ४० टक्के रक्कम ही आरोपींना मिळत होती. अद्यापपर्यंत आरोपींकडून गुन्ह्यातील ९७ मोबाईल, इंडिका कार होंडा अॅक्टीवा दुचाकी असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हयातील मुख्य सुत्रधार आरोपी लक्ष्मण आण्णा जाधव वय ३४ वर्षे रा. हॅप्पी कॉलनी, लेन नंबर-३, गोसावी वस्ती, - कोथरुड पुणे. हा पोलीसांच्या रेकॉर्डवरिल गुन्हेगार असून तो वेगवेगळ्या गुन्ह्यात पाहीजे आरोपी आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री. नामदेव चव्हाण सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा नम्रता पाटील सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अरविंद गोकुळे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. दिगंगर शिंदे सो, पोनि (गुन्हे) श्री. विश्वास डगले सो पोनि. (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान डंबडे, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंधरकर यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post