नुकसानीत असलेल्या पीएमपीचा पाय आणखी खोलात



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :   अगोदरच नुकसानीत असलेल्या पीएमपीचा पाय आणखी खोलात घालण्याचा घाट पीएमपी प्रशासनानेच घातल्याचे समोर येत आहे. पीएमपीच्या ताफ्यात स्व-मालकीच्या तब्बल 1 हजार 12 बस असताना त्यातील केवळ 600 बस संचलनात आणल्या जात आहेत. तर, ठेकेदारांच्या हजार बस धावत आहेत. परिणामी, पीएमपीला ठेकेदारांच्या बसचे भाडे देण्यासाठी महिन्याला चार कोटींची पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या बस रस्त्यावर आणण्यासाठी हिरवा “झेंडा’ नेमका कोण दाखवतंय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नवनियुक्त संचालक ओमप्रकार बकोरिया “ठेकेदारांच्या बस प्राधान्य’ धोरणाला लाल “झेंडा’ दाखविणार का? याबाबत उत्सुकता आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत पीएमपीद्वारे दररोज सुमारे 10 ते 12 लाख जण प्रवास करतात. पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 142 बस आहेत. यातील स्वमालकीच्या 1012, तर भाडेतत्वावरील 1130 बस आहेत. रोज सुमारे 1600 ते 1650 बसमार्फत ही सेवा दिली जाते. पण यापैकी केवळ 602 बस या स्वमालकीच्या आहेत तर 980 ते 1000 बस या ठेकेदाराच्या आहेत. जर पीएमपीकडे स्वमालकीच्या 1012 बस असतील तर त्यापैकी केवळ 602 बसच का मार्गावर धावत आहेत? ठेकेदाराच्या 1130 बस पैकी 990 बस रोज मार्गावर धावत आहेत. यावरून पीएमपी प्रशासनातील अधिकारी पीएमपीचे वेतन घेऊन नेमकी पीएमपीची तिजोरी भरतात, की ठेकेदारांची? याबाबत उलटसुलट चर्चा प्रशासनात सुरू आहेत.

एका बाजूला पीएमपीची संचलन तूट 720 कोअींवर गेली आहे. पीएमपीला दर महिन्यास 42 ते 45 कोटी रुपयांचे उत्पन्न असून त्यातून 25 कोटी रुपये ठेकेदारांचे दिले जातात. याचाच अर्थ उत्पन्नाच्या 55 ते 60 टक्के उत्पन्न हे ठेकेदारांच्या संचलनावर खर्च होत आहे. त्यामुळे पीएमपीच्या जास्तीत जास्त बस संचलनात आणण्यास अडचण काय, याबाबत अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.

खासगी बस वाढल्याने होणारे नुकसान
एकूण वाढविलेल्या बस – 90 ते 95
दररोज सरासरी – 200 कि.मी.
दररोज – 18,600 कि.मी.
महिन्याला – 5 लाख 58 हजार कि.मी.
ठेकेदरांना दिला जाणारा सरासरी दर – 68 रुपये प्रती कि.मी.
महिन्याला वाढणारा खर्च – 3 ते 4 कोटी रु.

Post a Comment

Previous Post Next Post