भ्रष्टाचार विरोधी समितीचा नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी शेख अब्दुल अजीज यांची नियुक्ती

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

नांदेड (मोहम्मद रिजवान ) : 

 नांदेड येथील समाजसेवक तथा नांदेड जिल्हा अॉटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष शेख अब्दुल अजीज पापामियां यांची भ्रष्टाचार विरोधी समितीचा नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी भ्रष्टाचार विरोधी समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद साबेर यांनी नांदेड येथे भ्रष्टाचार विरोधी समितीचा मेळाव्यात सदर नियुक्तीपत्र देऊन नियुक्त केले आहे.

मागील विस वर्षापासून अब्दुल अजीज हे भ्रष्टाचार निर्मुलन अभियानात सक्रीये होते तसेच जिल्ह्यात  अजीज यांनी अनेक आंदोलन,धरने, उपोषण केले होते.आता भ्रष्टाचार विरोधी समिती हे राष्ट्रीय स्तरावर नोंदी करून आता  प्रत्येक जिल्ह्यात नविन्याने नियुक्ती करीत आहे असे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद साबेर यांनी अजीज यांना नियुक्तीपत्र देताना सांगितले आहे.

यावेळी मराठवाडा अध्यक्ष मोहम्मद मिनाजोद्दीन यांची नियुक्ती केली आहे.

यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष अब्दुल कय्यूम,सय्यद इद्रिस, शेख मुबिन,मोहम्मद सोहेल, सय्यद वसिम,शेख निसार,जालना येथील अय्युब खान,ईकराम शेख आदींची उपस्थिती होती

Post a Comment

Previous Post Next Post