मळसुर येथील सरपंच अपात्र

 आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांचा आदेश


प्रेस मीडिया लाईव्ह :

पातुर  प्रतिनिधी : 

 ग्राम मळसूर ता. पातुर जि. अकोला येथील ग्रा. पं. सदस्य व माजी सरपंच सीताराम कनिराम चव्हाण यांनी मळसूर येथील सरपंच शिवाजी सुखदेव देवकते यांचे विरूध्द महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९ (१) नुसार आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते. सदरहू प्रकरणात सीताराम चव्हाण यांनी सरपंच शिवाजी देवकते यांचे विरूध्द दलितवस्ती सुधार योजनेच्या १५.०० लक्ष रू. च्या मंजूर झालेल्या कामाची ई-निविदा करून डि.एस.सी. तयार केली नाही तसेच ई-निविदा करण्यास टाळाटाळ केली. त्याचप्रमाणे मळसूर येथील नागरीकांच्या घराच्या नोंदी ह्या शासन निर्णया प्रमाणे न करता अनोंदणीकृत दस्तऐवजाच्या आधारे केली. 

तसेच ग्रा.पं. सदस्याच्या निवेदनाप्रमाणे कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच मळसूर येथील निवासी निवाऱ्या समोरील अतिक्रमण काढुन टाकण्याबाबत व आठवडी बाजारातील अतिक्रमण काढण्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच मळसूर येथील नागरीकांच्या नमुना ८ मध्ये कोणताही अधिकार नसतांना कर आकारणी रजिस्टरमध्ये खोडतोड केली. तसेच शासकीय जागेची नोंद मळसूर येथील नागरीकांच्या नावावर शासकीय जागा केल्या असा आरोप आपले याचिकेमध्ये केला होता. प्रस्तुत प्रकरणात आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला यांचा अहवाल मागितला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला यांनी केलेल्या चौकशीत अर्जदार सीताराम चव्हाण यांनी केलेले वरील सर्व आरोप सिध्द झाले. त्यामुळे आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांनी दि. २८.१०.२०२२ रोजी मळसूर ता. पातुर जि. अकोला येथील सरपंच शिवाजी देवकते यांना म.ग्रा.पं. अधिनियम १९५९ चे कलम ३९ (१) नुसार अपात्र घोषित केले. प्रस्तुत प्रकरणात अर्जदार सीताराम चव्हाण यांच्याकडून अॅड. अभय थोरात व अपात्र सरपंच यांचेकडून अॅड. पी. आर. देशमुख, अमरावती यांनी काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post