पत्रकार मोहम्मद रिजवान मोहम्मद युसूफ यांना "युवा गौरव" पुरस्कार घोषितप्रेस मीडिया लाईव्ह :

नांदेड (प्रतिनिधी ) : 

नांदेड येथील पत्रकार मोहम्मद रिजवान मोहम्मद युसूफ यांना "युवा गौरव" पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सा. औरंगाबाद युवाचे संपादक तथा युवा शक्ती पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम अब्दुल रशिद व टिमने घोषित केले आहे.

सा. औरंगाबाद युवाचा १७ वा वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रातकार्य करणाऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून दरवर्षी प्रमाणे या वर्षीही देण्यात येणार आहे.

सा.औरंगाबाद युवा तसेच युवा शक्ती पत्रकार संघा तर्फे १३ नोव्हेंबर २२  रविवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता मौलाना आझाद रिसर्च सेंटर मजनूहिल टिव्ही सेंटर रोड येथे कार्यक्रम आयोजित केला आहे.

मोहम्मद रिजवान 15 वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात काम करीत आहे.नांदेड येथील उर्दू मराठी दैनिक नांदेड डायरीत पाहत आहे.मोहम्मद रिजवान यांना पत्रकारीता क्षेत्रात योगदानाबदल  पुरस्कार देण्यात येणार आहे.

मोहम्मद रिजवान यांना पुरस्कार घोषित झाल्याबदल त्यांचे पत्रकार मित्राकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post