महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनेवर लक्ष घालणार लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना केले आश्वासितप्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई, ता. १८ : महाराष्ट्रातील वसई परिसरात राहणाऱ्या श्रद्धा हत्याप्रकरणी योग्य ते लक्ष घालून कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची माहिती आज लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मुंबईत दिली.  आज मुंबईमध्ये आलेल्या भेटी दरम्यान या विषयावर त्यांनी चर्चा केली डॉ. गोऱ्हे यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना आज लेखी निवेदन दिले.

 तसेच महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या घडामोडींची माहिती दिली. 

महिलांच्या सुविधांसाठी समाजामध्ये मोक्याच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास व्हावा. केंद्रीय पुरातत्व विभागाचे महाराष्ट्रातील दुर्ग , मंदिरे याकडील दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले.

लष्करात आणि महत्त्वाच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मसन्मानासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात. श्रद्धा वालकर च्या केस मध्ये पकडला गेलेला आरोपी याला फाशीची शिक्षा सुनावण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अशा स्वरूपाच्या मागण्या या निवेदनामध्ये त्यांनी केल्या आहेत. 

याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली त्यावर त्यांनी त्वरित संमती देत याबाबत कार्यवाही करीत असल्याचे सांगितले. 

चौकट : 

या भेटीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते.  त्यांनी यावेळी डॉ. गोऱ्हे यांची वालकर केसमध्ये दिल्ली पोलीसंना सहाय्यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्याची अपेक्षा मान्य केली तसेच महिलाविषयक कामाची प्रशंसा देखील केली. यावर लोकसभा अध्यक्षांनी त्वरित संमती दर्शवली. संसदीय कार्य समितीच्या बैठकांना नीलम ताईं गोर्हेंची उपस्थिती नेहमीच असते असेही श्री. बिर्ला यांनी यावेळी सांगितले. 


Post a Comment

Previous Post Next Post