सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कारभारात गेल्या पाच वर्षांत फक्त भ्रष्टाचारच

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कारभारात गेल्या पाच वर्षांत फक्त भ्रष्टाचारच  झाला आहे . विद्यापीठाची गुणवत्ता वाढविणे लांबच केवळ आर्थिक हितसंबंध डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या गेल्या आणि त्या बंद ही पडल्या आहेत . त्यामुळे अशा भ्रष्टाचारी मंडळींच्या हाती पुन्हा विद्यापीठाची सत्ता देणार का असा प्रश्न राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय मोरे यांनी केला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलच्या माध्यमातून विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीत उतरली आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना जगताप म्हणाले, प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी लाखो रुपयांचे संसार साहित्य विद्यापीठ निधीतून घेतले. प्लेसमेंटच्या नावाखाली नाममात्र विद्यार्थ्यांवर 34 लाख खर्च केले, पीएचडी व पदव्युत्तर शुल्कात दुप्पट वाढ केली. कुलगुरूंच्या निरोप समारंभावर संगीत मैफलीवर लाखोंची उधळपट्टी केली.

रानडे इन्स्टिट्यूट बंद पाडून ती जागा हडप करून त्यावर मॉल करण्याचे प्रयत्न केले असे अनेक गैरकारभार ज्यांच्याकडे सिनेटचा कारभार होता त्या मंडळींनी केला. या काळात विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणासाठी मात्र खर्च झाला नाही, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला. तर कुलदिप आंबेकर यांनी आता विद्यापीठाची कारभार राजेश पांडेच्या हाती द्यायचा की, जगताप-मोरे यांच्या हाती द्यायचा हे विद्यार्थ्यांनी ठरवावे असे आवाहन केले. 

Post a Comment

Previous Post Next Post