बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप,संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड) पेठ वडगांव येथे “सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस कार्येक्रम संपन्न.प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप,संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड) पेठ वडगांव येथे “सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस”Exhibition on “Sardar Patel – The Architect of Unification” … कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

      कार्यक्रमाच्या  सुरुवातीला  “Exhibition on "Sardar Patel - The Architect of Unification" या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या  हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित पोस्टरची पाहणी मान्यवरांनी केली. कार्यक्रमाच्यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा प्र.प्राचार्या.सौ.निर्मळे आर.एल आणि प्रमूख पाहूणे मा.श्री.संजय मनोहर पाटील(माजी सैनिक)तसेच श्री.सोरटे एस.के उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले व दीप प्रज्वलना नंतर “राष्ट्रीय एकता शपथ” घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्राध्यापिका ज्योती शेटे यांनी केले. तसेच छात्राध्यापिका वृषाली मुंडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. 

   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. सैनिक मा.श्री.संजय मनोहर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. आत्मसमर्पण व जबाबदारीची जाणीव व अन्नाचे महत्त्व याविषयी माहिती सांगितली.त्याचबरोबर त्यांनी इंडियन आर्मी मधील एकात्मतेचे दर्शन घडवले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्र.प्राचार्य.सौ.निर्मळे आर्.एल मॅडम यांनी एकतेचे महत्व राष्ट्रासाठी किती महत्त्वाचे आहे  सांगीतले व आपल्या देशाच्या सैनिकांचे कौतुक व आभार मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा. श्री.सोरटे एस.के, सौ शिरतोडे व्ही.एल, प्रा.कु.मुजावर एस.ए आणि प्रा.सावंत ए.पी. तसेच  छात्राध्यापक, छात्राध्यापिका  व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  छात्राध्यापिका तबस्सूम नदाफ व शुभांगी पाटील यांनी केले. छात्राध्यापक प्रमोद पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

 या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री विजयसिंह माने साहेब व संस्थेचे कार्याध्यक्ष विकासराव माने यांचे सहकार्य, मार्गदर्शन लाभले

Post a Comment

Previous Post Next Post