विनायक निम्हण यांच्या निधनाने पुणे शहर शिवसेनेचे एक खंबीर नेतृत्व गमावले : विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला स्मृतींना उजाळा

 आज पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात शोकसभेत मांडले विचार

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे, ता. ५ : जनतेचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम कार्यरत असलेले एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांची ओळख होती. शिवसेना पक्षाच्या कल्पवृक्षाखाली त्यांचा राजकीय उदय झाला. त्यानंतर त्यांचा कुटुंबाचा राजकारणात चांगला वावर सुरू झाला. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांचे त्यांच्यावर विश्वासपूर्ण नाते असल्याने त्यांच्यावर नंतरच्या काळात पुणे शहरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्यजी ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना परिवार यांच्या वतीने देखील श्रद्धांजली वाहताना आज मनात खूप भावना आहेत. 

त्याच्या काळात पुणे शहरात वाजत गाजत गुढीपाडवा साजरा करण्याचा प्रघात त्यांनी सुरू केला. आपल्या शहरातील सर्वपक्षीय सहकाऱ्यांना संत्रा बर्फी, मिठाई देण्याचा प्रघात त्यांनीच सुरू केला. त्यांना आज मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्याशी आमच्या कुटुंबीयांचे मागील २४ वर्षांपासून सलोख्याचे संबंध होते. 

त्यांच्या मोबाईलला कायम  असलेली  ट्यून केशवा माधवा अतिशय छान होती. लोकांना जोडण्याची तो एक महत्त्वाचा धागा असल्याचे ते सांगत. सर्वांशी अगदी सबुरीने वागण्याची पद्धत होती. अनेक विषयांवर सल्ला मसलत करण्याचा चांगला स्वभाव होता. 

शिवसेना पक्षातही त्यांनी चांगले काम केले. शिवसेना पक्षात  मातोश्रीच्या कल्पवृक्षाखालील अनेक जण  आहेत. शिवसेनेत त्यांचे स्थान ध्रुवतारा असल्याप्रमाणे आहे. पुणे शहरातील त्यांचे काम समृद्ध करता येऊ शकेल. पावसाळी अधिवेशनात त्यांची भेट झाली होती. त्यांच्या मनात काहीही अढी किंवा किल्मिष नव्हते .मनमुराद गप्पा मारल्या. पुण्याची वेगळी सर्वसमावेशक संस्कृती आहे ती तशीच ती राहावी. शिवसेनेचे युवानेते आदित्यजी ठाकरे यांनी दिनांक २७ ऑक्टोबर रोजी निम्हण कुटुंबियांना भेट देऊन त्यांच्या पत्नी स्वाती ताई आणि कुटुंबियांचे सांत्वन केल्याची आठवण यावेळी डॉ. गोर्‍हे यांनी केली.

या शोकसभेला आज विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर, विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, दीपक पायगुडे, माजी आमदार उल्हास पवार, शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, उमेश वाघ, श्रीकांत शिरोळे, पुणे महापालिकेचे माजी सदस्य अरविंद शिंदे, माजी महापौर प्रशांत जगताप, नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सिने कलावंत प्रवीण तरडे, महेश करपे, प्रवीण डोंगरे आदी मान्यवरांसह शिवाजीनगर मतदार संघातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. 


Post a Comment

Previous Post Next Post