जिल्हा परिषद पाले शाळेत भरला गणिताचा मेळावा


प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामधील  रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाले येथे शाळा पाले व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणित शैक्षणिक साहित्य मेळावा व प्रदर्शन आयोजित केले होते,यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने स्वतः तयार केलेल्या गणिताच्या शैक्षणिक साहित्याचे मांडणी करून त्यांचे सादरीकरण केले, साहित्याच्या आधारे विविध उदाहरणे सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने सोडविता येतात हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले . 

 यावेळी पालक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच श्री नागेंद्र म्हात्रे सारडे विकास मंच अध्यक्ष उपस्थित होते. या प्रसंगी त्यांचे मित्र श्री प्रसाद पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त मुलांना खाऊ करिता त्यांनी ₹१०००/- दिले. त्याचप्रमाणे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन उरणची संपूर्ण टीम  पालकांनी  आपल्या प्रतिक्रिया   मांडताना म्हटले की आम्हाला लहानपणी गणित याविषयी भीती होती पण जर अशा कृतीयुक्त मॉडेलच्या माध्यमातून मुलांना गणित शिकवलं गेलं असेल तर ते नक्कीच त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील आणि गणिता विषयी भीती मुलांच्या मनात राहणार नाही . या कार्यक्रमास प्रथम एज्युकेशन फाउंडेशन  उरण ची संपूर्ण टीम उपस्थित होती    शेवटी शाळेतील उपशिक्षिका सौ पुष्पलता म्हात्रे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post