अंबाबाई मंदिरात सापडलेले सव्वा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र प्रामाणिकपणे परत केले.

गायत्रीने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल तिचा पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सत्कार केला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर : येथील अंबाबाई मंदिरात सापडलेले सव्वा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांनी इचलकरंजी मधील भाविक शिवानी अवधूत गोलवंडे या महिलेला सुपूर्द केले.

शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविकांची मंदिर परिसरात गर्दी होत आहे. आज पहाटे ६ वाजता इचलकरंजी मधील शिवानी गोलवंडे या नातेवाइकांसोबत दर्शनासाठी आल्या होत्या. गर्दीत गोलवंडे यांचे सव्वा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पडले. ते मंगळसूत्र बोंद्रेनगर येथील गायत्री गावडे हिला सापडले. तत्काळ गायत्रीने कोणताही मोह न दाखवता प्रामाणिकपणे हे मंगळसूत्र जुना राजावाडा पोलिसांकडे सुपूर्द केले. पोलिसांनी मंगळसूत्रा बाबत खात्री करून दर्शनासाठी आलेल्या तारदाळ-इचलकरंजीमधील शिवानी गोलवंडे यांना परत केले. गायत्रीने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल तिचा पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सत्कार केला.

Post a Comment

Previous Post Next Post