पुण्यातील चांदणी चौकातला बहुचर्चित पूल अखेर आज राञी पाडला जाणार

 दोन्ही रस्त्यांची वाहतूक रात्री 8 नंतर थांबण्याचं काम सुरू केलं जाईल.

चांदणी चौक परिसरात कलम 144 लागू 


प्रेस मीडिया लाईव्ह :

अनवर अली शेख :

पुण्यातील चांदणी चौकातला बहुचर्चित पूल अखेर आज राञी पाडला जाणार आहे. मध्यराञी दोन वाजता नियंञिक स्फोटाद्वारे हा पूल अवघ्या 6 सेकंदात उडवला जाईल.त्यासाठी या पुलाला 1300 छिद्र पाडून 600 किलो स्फोटकं भरण्यात आली आहेत. तसंच स्फोटानंतर धूळ उडू नये, यासाठी फायबरचं आवरण पूलावर अंथरण्यात आलंय... स्फोटासाठीची सर्व तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे. चांदणी चौक परिसरात कलम 144 लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे. रात्री 11 वाजण्याच्या आधी सर्व परिसर निर्मनुष्य करण्यात येणार आहे.

सगळ्या गोष्टी नीट असतील, कनेक्शन नीट असतील तर ब्लास्टची वेळ आधी होईल. 1 ते 2 या वेळेत पुल पाडला जाईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले. सकाळी लवकरात लवकर रस्ता सुरू होण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील. दोन्ही रस्त्यांची वाहतूक रात्री 8 नंतर थांबण्याचं काम सुरू केलं जाईल.

संध्याकाळी 6 नंतर 200 मीटरचा परिसर निर्मनुष्य करायला सुरूवात होईल. लवकरात लवकर पूल पाडून नागरिकांना गैरसोय होणार नाही, हा प्रयत्न आहे. सकाळी 8 वाजता वाहतूक सुरू होईल याचे प्रयत्न होतील, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. पूल पाडल्यानंतर राडारोडा नियोजित वेळेतच बाजूला केला जाईल याची विशेष दक्षता घ्यावी आणि त्यासाठी गरज असल्यास अतिरिक्त वाहने आणि मनुष्यबळ तैनात करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेपूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात आले आहे. 600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात येणार आहे. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोग नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात येणार आहे. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे करण्यात येत आहेत.

सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण 3 पोलीस उपायुक्त, 4 सहायक आयुक्त, 19 पोलीस निरीक्षक, 46 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच 355 पोलीस कर्मचारी असे एकूण 427 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post