4 लाईफ कंपनी तर्फे पुनाडे आदिवासी वाडीवर 100 सावा वॉटर पुरीफाईड जारचे वाटप



प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील


 "अवघे विश्व हेच माझे घर या संकल्पनेतून साकारलं बहुउपयोगी बहुउद्देशीय रचनात्मक दृष्टीने "म्हणजे निर्मळ उज्ज्वल आयुष्य जगण्याकरीत काही शुद्ध गोष्टींची आवश्यकता असते जसे सकस आहार,शुद्ध हवा तसेच  शुद्ध पाणी ,जर पाणी शुद्ध असेल तर पोटाचे आजार पोटात जीवजंतू प्रवेश करत नाही व आरोग्य उत्तम राहते व जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळत असते ही गरज ओळखून 4 लाईफ कंपनी ही नेहमी सतत अश्या प्रकारचे उपक्रम राबवून आपल्या तळागाळातील लोकांचे आरोग्य हे सुंदर राहावे या साठी प्रयत्नशील असते  

प्रामुख्याने उन्हाळयात पाणी टंचाई आणि आदिवासी बांधव यांच्या आरोग्याचा विचार करत  4लाईफ कंपनी तर्फे सावा सोलर वॉटर पुरीफाय जार चे वाटप करण्यात आल पाण्याची टंचाई आणि उन्हाळयात आदिवासी बांधवाना स्वच्छ पाणी मिळाव आणि त्याच आरोग्य सुधाराव यासाठी 4लाईफ चे मुख्य शमींदर कोचर साहेब,नेव्ही निवृत्त अधिकारी संतोष खंडागले साहेब ,वास्तू विशारद जयश्री खंडागॆ मॅडम व कोचर मॅडम यांच्या  सौजन्याने व सारडे विकास मंच , सुयश कलासेस आवरे व साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या आयोजनातुन सोलर वर चालणारे सावा वॉटर पुरीफाईड जार च वाटप करण्यात  आलं कार्यक्रम चे प्रस्तविक हे श्री नागेंद्र म्हात्रे सर यांनी केले सदर प्रसंगी अध्यक्ष शमीनदर कोचर साहेब , सारडे विकास मंच चे कार्याध्यक्ष रोहित पाटील, रामनाथ पाटील,हरीश म्हात्रे ,त्रिजन पाटील , महेश पाटील सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर सुयश कलासेस आवरे चे निवास गावंड सर साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे सर्वेसर्वा राकेश पाटील सर सूत्रसंचालन आणि आदिवासी बाधवाना हा जार कसा वापरता येईल याची माहिती मिलिंद म्हात्रे यांनी दिले भविष्यात असे समाजउपयोगी कार्यक्रम आपल्या सर्वांच्या हातून व्हावं आस कोचर यांनी आपल मनोगत व्यक्त करत सर्व टीम ला शुभेच्छा दिल्या

Post a Comment

Previous Post Next Post