जेष्ठ पत्रकार आरेफ देशमुख यांचा पटेल-देशमुख-देशपांडे समाजाच्या वतीने होणार सन्मान



प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद, दि.9  (अब्दुल कय्यूम )

मागील 23 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जेष्ठ पत्रकार आरेफ रज्जाक देशमुख यांचा समाजाच्या वतीने सिल्लोड येथे 16 फेब्रुवारी 2022 रोजी सन्मानित करुन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पत्रकार देशमुख यांच्या जीवनाचा प्रवास फार खडतर राहिला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद व पत्रकारिता विद्या विभागातून त्यांनी BAMCJ पत्रकारिता विद्या प्राप्त केली. सन 1999 मध्ये मराठवाड्यातील प्रथम हिंदी दैनिक औरंगाबाद सिटीझन्स वृत्तपत्रातून त्यांनी पत्रकारीता क्षेत्रात सुरुवात केली. नंतर प्रसिद्ध उर्दू दैनिक एशिया एक्स्प्रेस मध्ये काम करत आहेत. जसजसे पत्रकारिता क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान प्रख्यात झाले सोशल मीडिया चा प्रभाव वाढत असल्याने स्वतः चे मराठी वेबपोर्टल डि-24 न्यूज कोरोना काळात वेळोवेळी ताज्या घडामोडी व बातम्या वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी कमी वेळेत प्रसिद्ध झाले. समोर कोणीही असो बेधडक प्रश्न विचारणे व निष्पक्ष लिखान करण्यात पत्रकार देशमुख यांची ख्याती आहे. सोशल मीडियावर व प्रिंट मिडीया प्रभावी करण्यासाठी त्यांच्या बातमीतून पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांनी कधीही पुरस्कार स्विकारलेला नाही पण समाजाच्या आग्रहाखातर ते सन्मान स्विकारणार आहे. सिल्लोड शहरात भव्य पटेल-देशमुख-देशपांडे बिरादरीच्या वतीने नीट,बारावी व दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. या समारंभात शैक्षणिक, सामाजिक, व्यवसायिक, पत्रकारिता क्षेत्रात समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणा-यांचा सुध्दा सन्मान करण्यात येणार आहे असे आयोजकांनी कळविले आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमात प्रमुख पाहुणे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खासदार श्रीमती फौजिया खान, खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार सिराज देशमुख, राष्ट्रवादी जालना जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख, वंचितचे नेते डॉ.जमील देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल मुकीम देशमुख व समाजातील हजारो लोक उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post