कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील हे स्वतःला भारतरत्न महर्षी कर्वे यांच्यापेक्षा मोठे समजतात का..?

 महापुरुषांचा असा अपमान कोथरूडकर, पुणेकर आणि आम आदमी पार्टी सहन करणार नाही.

कर्वे पुतळ्या शेजारी खेटून असलेला चंद्रकांत पाटील यांच्या फ्लेक्सवर तातडीने कारवाई करत काढून टाका : डॉ अभिजीत मोरे, आप प्रवक्ते


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूरहून कोथरूडला राजकीय पुनर्वसन झालेले कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे स्वतःला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापेक्षा मोठे समजत आहेत का ? असा प्रश्न सर्वसामान्य कोथरूडकरांना आणि पुणेकरांना पडलेला आहे. कर्वे पुतळ्या शेजारी व तेही पुतळ्याच्या आवारात कोथरूडच्या आमदार चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल मोठा फ्लेक्स उभारला गेला आहे. त्याची उंची महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. अशा पद्धतीने महापुरुषांच्या पुतळ्याच्या आवारात स्वतःचा मोठा फ्लेक्स लावून भारतीय जनता पक्षाने महर्षी कर्वे यांचा अपमान केला आहे. 

याबद्दल भारतीय जनता पक्षाने समस्त कोथरूडकरांची, पुणेकरांची माफी मागितली पाहिजे. तसेच पुणे महानगरपालिकेने या फ्लेक्स वर तातडीने कारवाई करत हा फ्लेक्स हटवावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी केली आहे. 

आश्चर्य म्हणजे हे ठिकाण चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालया समोर आहे.

आज "महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री अभिवादन फेरी"चे आयोजन आम आदमी पक्षातर्फे आंबेडकर चौक वारजे येथून महर्षी कर्वे पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गांधी भवन अशी आयोजित केली होती. या अभिवादन फेरी दरम्यान ही बाब आम आदमी पक्षाच्या निदर्शनास आली आहे. ज्यावेळी आम आदमी पक्षाची टीम महर्षी कर्वे यांना अभिवादन करण्यासाठी, पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेली त्यावेळी पुतळ्या शेजारील भाग हा बंदिस्त केला होता आणि त्याच्या आत मध्ये मात्र एवढा मोठा फ्लेक्स उभारल्याची बाब ही आम आदमी पक्षाला खटकली. महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सामान्य लोक जाऊ शकत नसताना भारतीय जनता पक्षाचे आमदार मात्र स्वतःचा भला मोठा फ्लेक्स महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याच्या आवारात तोही त्यांच्या उंचीपेक्षा जास्त मोठा कसा काय उभा करू शकतात हा प्रश्न सर्वांना पडला. सर्वांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अभिवादन फेरीचा आयोजन प्राध्यापक सुहास पवार, सुशील बोबडे, निलेश वांजळे, प्राध्यापक बाबासाहेब जाधव यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले होते. 




Post a Comment

Previous Post Next Post