जागतिक परिहार सेवा दिवस तक्रारवाडी उपकेंद्र अंतर्गत मदनवाडी येथे साजरा सर्व रोग निदान शिबिर 113लाभार्थ्यांना लाभ



प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रतिनिधी :जब्बार मुलाणी

 भिगवण, मदनवाडी

    काही आजारांमुळे असलेले रुग्णांना वेदना तसेच सामाजिक व मानसिक त्रास असतात उदाहरणार्थ कॅन्सर ,एच आय व्ही ,कुष्ठरोग , टीबी हृदयरोग फुफुसांचे आजार ,अर्धांग वायू, वार्धक्य अत्यंत गंभीर असली आजारा असलेली बालके अशा पीडाग्रस्त व्यक्तींची पीडा व वेदना हलक्या करण्यासाठी तसेच त्यांचे व त्यांच्या कुटुंबांची जीवनमान सुधारण्यासाठी पीडित व्यक्तींची व त्यांच्या कुटुंबीयांची एकत्रितपणे काळजी घेणे आवश्यक असते.


 ज्या योगे पीडितग्रस्त व्यक्ती आपले जीवन सुव्यवस्थित व आदरपूर्वक जगू शकेल अशा प्रकारच्या काळजीला परिहार सेवा असे म्हणतात अशा प्रकारच्या परिहारसेवा आपल्या तक्रारवाडी उपकेंद्रामध्ये उपलब्ध आहेत

आशा सेविकेने गृहभेटीदरम्यान वरील दिलेल्या आजारांनी पीडित असलेल्या व्यक्तींना आपल्या जवळच्या उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी योग्य तो सल्ला व मार्गदर्शनासाठी संदर्भित करायचे आहे.

तक्रारवाडी उपकेंद्र तर्फे तक्रारवाडी उपकेंद्रात अंतर्गत असणाऱ्या नागरिकांना जाहीर आवाहन करते की त्यांनी या परिहार सेवेचा लाभ घ्यावा ज्या व्यक्तींना ज्या पद्धतीची आजार असेल त्यावर योग्य जिल्हा रुग्णालय औंध, ससून सरकारी हॉस्पिटल, cipla palliative care center वारजे पुणे यांसारखे मोफत सेवा देणारे रुग्णालय  येते आपल्या विनामूल्य महाराष्ट्र शासनाच्या 108 रुग्णवाहिका मार्फत योग्य त्या रुग्णालयांमध्ये  रुग्णास संदर्भित केले जाते.

याचा लाभ गरजूंनी घ्यावा...मदनवाडी मध्ये पीडित व्यक्तींना घरभेटी देऊन योग्य तो सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिर मध्ये  गर्भिणीमाता स्तनदा माता,  0-6 वयोगटातील बालके ,30 वर्षावरील महिलांचे असंसर्गजन्य (उच्च रक्तदाब मधुमेह मुखाचा कर्करोग ) ,  रक्तगट, हिमोग्लोबिन ,रक्तातील साखर  ECG इत्यादी चाचणी करण्यात आली व औषधोपचार तसेच बुधरानी हॉस्पिटल टीम वतीने मोफत डोळ्यांची तपासणी चार मोतीबिंदूचे पेशंट आढळून आले त्यांना 28 तारखेला ऑपरेशन साठी पाठवण्यात येईल.

 अगा खान हेल्थ सर्विसेस इंडिया यांच्यावतीने परिहार सेवा मार्गदर्शन करण्यात आले

प्रमुख उपस्थिती- सरपंच आम्रपालीताई बंडगर, उपसरपंच श्री शिवाजी देवकाते, सदस्य श्री राजेंद्र देवकाते, सदस्य ,श्री तेजस देवकाते समुदाय आरोग्य अधिकारी डॉ मृदुला नितिन जगतापडॉ.अमोल खानावरे ( स्त्री रोग तज्ञ ग्रामीण रुग्णालय भिगवन)

डॉ. राहुल जाधव (एमबीबीएस डीएनबी, भिगवन मेडिकेअर हॉस्पिटल), डॉ. वल्लभ वेदपाठक(भिगवन मेडिकल)डॉ.कैलास व्यवहारे (बालरोग तज्ञ ग्रामीण रुग्णालय निमगाव केतकी)अ गा खान हेल्थ सर्विसेस इंडिया -प्रोजेक्ट मॅनेजर श्री राजेश जैनजंगडे , संतोष शिंदेआरोग्य सेविका-प्रिया भोसलेआशा वर्कर-सीमा मारकड, सविता देवकाते, मनीषा देवकाते

Post a Comment

Previous Post Next Post