मनुभाईना प्रबोधिनीची श्रद्धांजलीप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,प्रेस मिडिया लाईव्हचे इचलकरंजीचे प्रतिनिधी, उत्कृष्ट मेकॅनिक ,सर्वांशी आपुलकीने वागणारे मनुभाई फरास हृदयविकाराच्या तीव्र ध्यक्याने कालवश झाले.हे अतिशय धक्कादायक आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी प्रेस मीडिया लाईव्हच्या सर्व सहकाऱ्यांसह  समाजवादी प्रबोधिनीत येऊन मला मानपत्र प्रदान केले होते. 

त्यावेळी झालेल्या विविध विषयावरच्या गप्पा या अखेरच्याच गप्पा ठरल्या याची मोठी चुटपुट लागून राहिली आहे.त्यांच्या जाण्याने एक चांगली व्यक्ती ,व्यापक समाजभान असलेला आणि मदतभावना ओतप्रोत भरलेला एक कार्यकर्ता आपण गमावला आहे. समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने मनुभाईना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो अशी भावना समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post