सारडे विकास मंच च्या किल्ले स्पर्धेला वाढता प्रतिसाद



प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

 गडकिल्ले आणि त्याच महत्व येणाऱ्या  भावी पिढीला समजाव यासाठी सारडे विकास मंच तर्फे सलग पाच वर्ष दिपावली निमित्य गडकिल्ल्याच आयोजन केले जात दरवर्षी प्रमाणे या वर्षी  ही या स्पर्धेत 35 हुन अधिक किल्ले सहभागी झाले आहेत या मध्ये रायगड , प्रतापगड, त्रिकोना, कर्नाळा,आशा किल्याच्या प्रतिकृती बनविण्याचा प्रयत्न मुलांनी केला या मध्ये रचित म्हात्रे यांना प्रथम क्र. तर  रूद्र पाटील याला द्वितिय क्र. देऊन सन्मानित करण्यात आला तर ,संस्कृती म्हात्रे,जय पाटील,अंश ठाकुर, राजेश पाशी,स्वाद पाटील, रिद्धी पाटील, आशा सहा स्पर्धकाना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले 

तर इतर सर्व सहभागी झालेल्या स्पर्धांना रोहित पाटील,आणि नितिन म्हात्रे याच्या मार्फत दिपावली ची सुंदर भेट देण्यात आली या कार्यक्रमा साठी साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे राकेश पाटील सर, सुयश क्लासेस आवरे चे निवास गावंड सर, न्हावा शेवा सिएचए संघटनेचे  सचिव हरिष म्हात्रे, खजिनदार मिलिंद म्हात्रे, सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरेचे नंदकुमार तांडेल, प्रशांत म्हात्रे सर,रोहित पाटील, त्रिजन पाटील, प्रणय ठाकूर,विवेकानंद ठाकुर 

आदी मान्यवरांच्या शुभ हस्त हा कार्यक्रम संपन्न झाला

Post a Comment

Previous Post Next Post