गंगामाईच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीय तेंगसुडो स्पर्धेसाठी निवड



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमधील अंजली नामदेव भस्मे आणि सृष्टी संतोष माळी व राजश्री राजेश कामत या तिघींची राष्ट्रीय तेंगसुडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

इचलकरंजी येथे तेंगसुडो स्पोर्ट्स ऑफ महाराष्ट्र मार्फत झालेल्या जिल्हास्तरीय तेंगसुडो स्पर्धेत अकरा वर्षाखालील गटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मधीलअंजली भस्मे हिचा प्रथम तर सृष्टी माळी हिचा द्वितीय क्रमांक आला. अठरा वर्षाखालील गटात राजश्री कामात हिचा द्वितीय क्रमांक आला .या यशामुळे त्यांची शिर्डी येथील राज्यस्तरीय तेंगसुडो स्पर्धेसाठी निवड झाली होती.

या स्पर्धेतही त्यांनी उज्वल यश संपादन करीत अठरा वर्षे खालील गटात राजश्री कामत हिचा प्रथम क्रमांक व अकरा वर्षाखालील गटात अंजली भस्मे हिचा तृतीय क्रमांक आला.या यशामुळे त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशाबद्दल ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, व्हॉईस चेअरमन उदय लोखंडे,  सेक्रेटरी बाबासाहेब वडिंगे , ट्रेझरर राजगोपाल डाळ्या, स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर, विश्वस्त कृष्णा बोहरा,महेश बांदवलकर यांनी सदर यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच

हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर, उपप्राचार्य आर. एस. पाटील, उपमुख्याध्यापिका एस. एस. भस्मे ,पर्यवेक्षक  व्ही. एन.कांबळे, एस. व्ही. पाटील यांनी देखील यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.या यशासाठी त्यांना क्रीडा प्रमुख शेखर शहा व प्रशिक्षक मनोज सातपुते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post