यंञमाग उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनामध्ये सुधारणा करण्याची मागणीप्रेस मीडिया लाईव्ह :

यंत्रमाग उद्योगातील कामगारांना किमान वेतन कधीच वेळेवर सुधारणा करून मिळत नाही.तरी या किमान वेतनामध्ये सुधारणा करुन कामगारांना न्याय द्यावा , अशा मागणीचे निवेदन लाल बावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेच्या वतीने राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांना देण्यात आले.

शेती खालोखाल सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन देणारा उद्योग म्हणून यंञमाग उद्योगाकडे पाहिले जाते.परंतू ,या उद्योगातील कामगारांच्या हिताकडे कायमच दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे या कामगारांचे जगणे अगदी बेभरवशाचे होवून बसले आहे.यंत्रमाग उद्योगातील कामगारांना किमान वेतन कधीच वेळेवर सुधारणा करून मिळत नाही ,ही वस्तुस्थिती आहे.यापूर्वी

१० जानेवारी १९८६ रोजी यंञमाग उद्योगातील कामगारांना किमान वेतन सुधारणा झाली होती.त्यानंतर १९४८ च्या किमान वेतन कायद्यानुसार प्रत्येक पाच वर्षांनी त्यामध्ये सुधारणा होणे अपेक्षित होते. महाराष्ट्र शासनाची ही महत्त्वाची वैधानिक जबाबदारी आहे.तथापि मालक संघटनांचा दबाव, तत्कालीन आजी माजी आमदार, कामगार मंत्री यांच्या साखळीने आणि कामगार खात्यातील नोकरशाहीने  , किमान वेतन कायद्याची वाट लावली आहे. तसेच तब्बल २७ वर्षे कामगारांच्या किमान वेतनावर डल्ला मारुन लाखो रुपये कामगारांचे लुटला असल्याचा आरोप असल्याचा आरोप लाल बावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेने केला आहे.तसेच याबाबत २७ वर्षांनंतर लाल बावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य काॅम्रेड ए. बी. पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.त्यामुळे २ फेब्रुवारी २०१५ रोजी महाराष्ट्र सरकारने २९ जानेवारी २०१५ चा किमान वेतन आदेश न्यायालयात सादर केला.त्यामुळेच २५० रुपये मुळ पगाराचे ९५०० रुपये झाले आणि महागाई भत्ता त्याप्रमाणे लागू करण्यात आला.परिणामी ,

उच्च न्यायालयाने वरील आदेश स्विकारला आणि पुढील सुधारणा डिसेंबर २०१९ पर्यंत करण्यासंबंधी  आदेश दिले. याप्रमाणे १ जाने २०२० रोजी कामगारांच्या किमान वेतनामध्ये 

सुधारणा करून देणे बंधनकारक होते.तथापि अद्याप किमान वेतन सुधारणा झाली नाही.याच अनुषंगानेलाल बावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेच्या वतीने राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांना निवेदन देवून यंत्रमाग उद्योगातील कामगारांना किमान वेतन कधीच वेळेवर सुधारणा करून मिळत नाही.तरी या किमान वेतनामध्ये सुधारणा करुन कामगारांना न्याय द्यावा , अशी मागणी करण्यात आली.तसेच याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.यावेळी लाल बावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य काॅम्रेड ए. बी. पाटील ,सचिव सूर्यकांत शेंडे , खजिनदार हणमंत मुत्तुर , दशरथ जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post