गणेशनगर परिसरातील वखार भागातील गल्ली नं. साडेतीन मध्ये लावलेला डिजीटल फलका बाबत जोरदार चर्चा



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी, ता. ११ येथील गणेशनगर परिसरातील वखार भागातील गल्ली नं. साडेतीन मध्ये लावलेला डिजीटल फलका बाबत जोरदार चर्चा सुरू आहे . गल्लीत गटारी, लाईट, पाण्याची सोय केला तरच मते मागायला या असा मजकूर लिहून उपरोधात्मक भागातील लोकप्रतिधींवर टीका केली आहे. सदरचा फलक सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन चर्चेचा विषय बनला आहे.शहरातील विविध प्रश्नाबाबत नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करत असतात. अनेक ठिकाणी रास्ता रोको, मोर्चे काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र सध्या गणेशनगर परिसरातील वखारभाग गल्ली नं. साडेतीन येथील नागरि समस्येबाबत एक वेगळीच शक्कल लढवून लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे. भागातील एका विद्युत खांबावर डिजीटल फलक लावून त्यावर ‘गल्ली नं.साडेतीन कडून सर्व भावी नगरसेवकांना विनंती आहे, जर आमच्या गल्लीच्या गटारी, लाईट, पाण्याचे नविन आहे.

तर मतदान मागायला या… समस्त गल्ली नं. साडेतीन मंडळ

पाईप व रस्ते करून द्यायचे असेल तर मतदान मागायला या’, असा मजकूर लिहीला असून जो उमेदवार स्वखर्चातून कामे करेल त्याला १०० टक्के मतदान देण्याची जबाबदारी राहील, अशी वेगळी टीप लिहीली आहे. या डिजीटल फलकावर लिहीलेल्या उपरोधात्मक टीकेबाबत भागात उलट-सुलट चर्चेला ऊत आला असून सोशल मिडीयावर याची चवीने चर्चा सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post