वीरशैव उत्कर्ष मंडळ इचलकरंजी यांच्यावतीने अनिल मल्लय्या स्वामी व प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे यांचा सत्कार करण्यात येणार.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी :  वीरशैव उत्कर्ष मंडळ इचलकरंजी यांच्यावतीने अनिल मल्लय्या स्वामी यांची श्री वीरशैव को-ऑप. मल्टिस्टेट बँकेच्या चेअरमनपदी आणि प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे यांची बोर्ड ऑफ मॅनेजमेंट संचालकपदी तसेच डीकेटीई संस्थेच्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता हा समारंभ श्रीमद गिरीराज सुर्यसिंहासनाधिश्‍वर श्री श्री श्री 1008 श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

दरम्यान, श्री श्री श्री 1008 श्रीशैल जगद्गुरु महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात श्रीक्षेत्र येडुर ते श्रीशैल क्षेत्रापर्यंत पदयात्रेचा आरंभ 29 ऑक्टोबर रोजी होणार असल्याने त्या संदर्भातील माहितीसुध्दा जगद्गुरु महास्वामीजी देणार आहेत.

जिल्ह्यातील अग्रणी श्री वीरशैव को-ऑप. मल्टिस्टेट बँकेच्या चेअरमनपदी नुकतीच अनिल स्वामी यांची निवड करण्यात आली आहे. तर बँकेच्या बोर्ड ऑफ संचालकपदी त्याचबरोबर टेक्स्टाईल आणि इंजिनिअरींग क्षेत्रात अग्रणी डीकेटीई संस्थेच्या खजिनदारपदी  प्रकाश दत्तवाडे यांनी निवड करण्यात आली आहे. या दोघांचा वीरशैव उत्कर्ष मंडळाच्यावतीने भव्य असा सत्कार समारंभ संपन्न होत आहे.  या समारंभासाठी श्री.ष.ब्र.108 ज्ञानभास्कर श्रीगुरु महादेव शिवाचार्य महाराज वाईकर व श्री.ष.ब्र.108 श्री गुरुसिध्देश्‍वर शिवाचार्य स्वामीजी क॥ नुल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शुक्रवारी (14 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता महेश सेवा समिती येथे हा समारंभ होणार आहे. या समारंभासाठी तसेच प.पू.जगद्गुरु महास्वामी यांचे दर्शन व आशिर्वचनासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वीरशैव उत्कर्ष सिव्हीक बोर्डाचे गजानन सुलतानपुरे, इरगोंडा पाटील व बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post