व्हिजन इचलकरंजी संघटना राबवणार माणुसकीची भिंत , ई-कचरा संकलन उपक्रम



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी

 दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब व गरजूंना नवे, जुने वापरायोग्य कपडे व वस्तू मिळावेत, या हेतूने मागील सात वर्षांपासून इचलकरंजी शहरात व्हिजन इचलकरंजी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माणुसकीची भिंत उपक्रम राबविण्यात येत आहे. या माणुसकीची भिंतीसह यावर्षी नागरिकांना भेडसावणारा ई-कचरा संकलन अभियानही राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम व्यंकटराव हायस्कूलसमोर बुधवार १९ ते शुक्रवार २१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे. या अभियानाला आजवर शहरवासीयांनी प्रतिसाद दिला असून याहीवर्षी मोठा प्रतिसाद द्यावा, असे आवाहन व्हिजन इचलकरंजीचे अध्यक्ष कौशिक मराठे यांनी केले आहे.

 

‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’ हे ब्रीद घेवून गरिबांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी, यासाठी व्हिजन इचलकरंजी या संस्थेतर्फे प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाला आजवर शहरवासीयांनी उस्फूर्तपणे मदतीचा हात दिला आहे. हीच परंपरा कायम जोपासत व्हिजन इचलकरंजी या संस्थेतर्फे माणुसकीची भिंत व मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावणारा ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाठिकाणी नागरिकांनी वापरण्यायोग्य नवे-जुने कपडे माणुसकीच्या भिंतीवर देऊन गरिबांची दिवाळी आनंदी करण्यासाठी मदतीचा हात द्यावा, तसेच घरी, दुकानात, कार्यालयात खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, वायर यासह विविध वस्तू या केंद्रावर संकलन करण्यात येणार आहे. जे वापरयोग्य आहे ते गरजू व गरीब विद्यार्थ्यांना देण्यात येईल, जे दुरुस्तीयोग्य आहे ती दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना वितरित केले जाईल, तर जे खराब आहे त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जाईल, त्यामुळे या माणुसकीची भिंत व ई-कचरा संकलन अभियानास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन या उपक्रमाच्या संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post