रेल्वे समितीच्या बैठकीत राढा अध्यक्षांसह इतर खासदारांनीही आपल्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा. प्रेस मीडिया लाईव्ह

अनवर अली शेख :

पुणे दि.१९,  रेल्वे समितीच्या  सदस्य पदी असलेल्या खासदारांच्या  मागणीला रेल्वे अधिकारी  वर्गाकडून केराची टोपली दाखवण्याची चर्चा रंगत असतानाच अचानक रेल्वे समितीचा वाद चव्हाट्यावर. खासदारांची  मागणी अशी होती कोविड काळात सुरु असलेले रेल्वे गाड्या पुन्हा सुरु कराव्यात, विद्यार्थी आणि प्रवाशांच्या मागणीनुसार थांबे द्यावेत अशा विविध मागण्या सातत्याने करून देखील रेल्वेचे अधिकारी ते ऐकत नसल्याने या बैठकीत सर्वच खासदार आक्रमक झाले. रेल्वे प्रशासनाने आपलीच मनमानी सुरु ठेवल्याने आपण विभागीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी जाहीर केले. याच पद्धतीने या समितीचे सदस्य असलेल्या खासदारांनी देखील राम राम केले 

रेल्वे विभागीय समितीचे अध्यक्ष खासदार रणजित निंबाळकर यांच्यासह सदस्य असणाऱ्या खासदारांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे. 

 आता हा वाद मोठा होण्याची राजकीय वर्तुळातून चर्चा सुरू झाली आहे. Post a Comment

Previous Post Next Post