भारतीय लोकशाहीबद्दलचा मधु लिमये यांचा दृष्टिकोन: या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न..,.प्रेस मीडिया लाईव्ह :

नागपूर : दि. १७  ऑक्टोबर २०२२:-   वसंतराव नाईक शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, नागपूर येथे डॉ. राम मनोहर लोहिया अध्ययन केंद्र व श्री बिजने नगर महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या "भारतीय  लोकशाहीबद्दलचा  मधु लिमये  यांचा दृष्टिकोन"  या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 


यावेळी मधु लिमये यांच्या बद्दलचा विशेष अंक प्रकाशित करण्यात आला.  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रसिद्ध विचारवंत रघु ठाकूर यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी पत्रकार व साहित्यिक प्राध्यापक जयंत सिंह तोमर तसेच डॉ. प्रकाश देशपांडे उपस्थित होते. या चर्चासत्रामध्ये आंतरप्रणाली विषयांवर वेगवेगळ्या राज्यातील प्राध्यापक व संशोधकांनी शोधनिबंध सादर केले . या चर्चासत्रात ३०  ते ३५   शोधनिबंध सादर करण्यात आले. या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये राजकारण, समाजकारण, प्रशासन, नोकरशाही, निवडणुका इत्यादी विषयांवर विचार मंथन झाले. यामध्ये पुण्याचे संशोधक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेवानिवृत्त शिक्षकेतर- कर्मचारी डॉ. तुषार निवृत्ती निकाळजे यांनी " कोविड-१९ च्या अनुषंगाने निवडणूक प्रशासनातील बदलांची गरज"  हा शोध निबंध सादर केला. या चर्चासत्राची  समन्वय व्यवस्था व आभार प्रदर्शन डॉ. संदीप तुडुरवार, डॉ. राहुल बावगे, डॉ. अनुप कुमार सिंह, डॉ. रेणू बाली यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post