औरंगाबाद : आज पोस्ट फोरमची बैठक संपन्न झाली

नागरीकांची विविध समस्यांचा निराकरण करण्यासाठी सदर बैठक आयोजित केली होती.


प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद (अब्दुल कय्यूम  ) : 

 जुनाबाजार येथील मुख्य टपाल कार्यालयात पोस्टमास्तर श्री सुरेश बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली टपाल पोस्ट फोरमची बैठक 12 ऑक्टोंबर दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय टपाल सप्ताह 9 ते 15 ऑक्टोंबर रोजी साजरा होत आहे. तसेच नागरीकांची विविध समस्यांचा निराकरण करण्यासाठी सदर बैठक आयोजित केली होती.

 यावेळी टपाल खात्यासाठी सदस्यांची सुचना होत्या ते यावेळी सदस्यांनी मांडली सध्या  सध्या पोस्ट विभागात ऑनलाइन ची समस्या जास्त असल्याने ती समस्या दुर करण्साठी काही उपाययोजना करण्यात येईल असे पोटमास्तर श्री बनसोडे यांनी आश्वासन दिले आहे. मैसूर येथून असल्याने  संपूर्ण देशभरात नेटवर्कचा इशू आहे.नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने आम्ही प्रयत्न करतोय त्रास दुर करण्याचे असे सांगितले आहे.

आधार कार्डची टोकण संख्या वाढविणे, सुकन्या योजनेच्या नागरीकांमध्ये जनजागरण करून कॅम्प घेणे, तसेच अब्दीमंडी येथे महिला व  लहानमुलांसाठी पोस्टातर्फे कॅम्प घेण्याचे ठरले आहे.

यावेळी पोस्टमास्तर श्री सुरेश बनसोडे,उपडाकपाल श्री सुनिल कोळी, जनसंपसंपर्क अधिकारी संजय पाटील,पोस्टल असिस्टंट जयकुमार फड,पत्रकार अब्दुल कय्यूम,संजय राऊत,रुबिना शाह आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post