गांधी विचाराचे महत्व कालातीत आहे.... प्रा . डॉ. भारती पाटील यांचे प्रतिपादन

प्रेस मीडिया लाईव्ह :

गडहिंग्लज ता. २१ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सत्य व अहिंसेसह एकूण विचारधारा मानवी जीवनासाठी अत्यावश्यक असून तिचे महत्त्व कालातीत आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होत असताना आपण राष्ट्रपित्याची विचारधारा पुढे घेऊन जाणे व त्या वैचारिक वसा आणि वारशाचा प्रसार व प्रचार करणे अत्यंत गरजेचे आहे.असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अध्यासनाच्या समन्वयक प्रा. डॉ.भारती पाटील यांनी व्यक्त केले.त्या


गांधी अध्यासन केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ,डॉ.घाळी महाविद्यालय, गडहिंग्लज आणि समाजवादी प्रबोधिनी शाखा गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने  " महात्मा गांधींचा वैचारिक वारसा आणि भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी "या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत  बीजभाषक म्हणून बोलत होत्या.

 दुसऱ्या सत्रामध्ये प्राचार्य आनंद मेणसे यांनी मांडणी केली. तर तिसऱ्या व समारोपाच्या सत्रामध्ये प्रसाद कुलकर्णी यांनी मांडणी केली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील होते. या कार्यशाळेत सर्वच वक्त्यांनी महात्मा गांधींचा विचार ,त्याचे समकालीन महत्त्व, त्याच्यासमोर आज उभी राहिलेली आव्हाने आदींचा सूत्रबद्ध उहापोह केला.

स्वागत व प्रस्ताविक प्रा. अनिल उंदरे यांनी केले. प्राचार्य कल्याणराव पुजारी व प्राचार्य साताप्पा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी वृक्ष जलार्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय तीन सत्रांमध्ये डॉ. शशिकांत संघराज, प्रा. शिवाजीराव होडगे व प्रा.डॉ. काशिनाथ तनंगे यांनी करून दिला. तर तीन सत्रांमध्ये प्रा. पुंडलिक रक्ताडे, डॉ.सरला आरबोळे ,प्रा.सुभाष कोरे यांनी आभार मानले. या कार्यशाळेत आप्पासाहेब कमलाकर ,उज्वला दळवी ,सरोजिनी पाटील ,सुनील शिंत्रे अशोक पट्टणशेट्टी, तानाजी कोळे यांच्यासह  गडहिंग्लज परिसरातील विविध महाविद्यालयातील अध्यापक वर्ग व विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ. सरोज बिडकर यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post