कोल्हापूर : परतीच्या पावसाने घातला आहे कोल्हापुरात धुमाकूळ

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : परतीच्या पावसाने  घातला  आहे कोल्हापुरात धुमाकूळ  कोल्हापुरातील अनेक भागात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे.जयसिंगपूर परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे. याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांना बसला आहे. सिद्धेश्वर पार्क भागातील 20 ते 25 घरं पाण्याखाली गेले आहेत. घरात पाणी शिरल्यानं सर्व संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजले असून, मोठं नुकसान झालं आहे.

घरात पाणी

कोल्हापूरकरांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापुरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे जयसिंगपूर परिसरात अनेकांच्या घरात गुढग्याइतके पाणी शिरल्याचं पहायला मिळत आहे. सिद्धेश्वर पार्क भागातील 20 ते 25 घरं पाण्याखाली गेले आहेत. घरात पाणी शिरल्यानं सर्व संसार उपयोगी साहित्य भिजल्याने मोठं नुकसान झालं आहे. यापूर्वी देखील कोल्हापुरात जोरदार पाऊस झाला होता.


पावसाचा शेतकऱ्यांना फटका

यंदा राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरूच आहे. या पवासामुळे शेतात पाणी साचले असून, पिके पाण्याखाली गेली आहेत. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन, कापूस आणि बाजरी या पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांच्या ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. त्यामुळे बळीराजा हातबल झाला आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा

परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला देखील पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. आणि आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post