छळवणूक करणाऱ्या पती व सासऱ्याविरुद्ध संगमनेर पोलिसांत गुन्हा दाखलप्रेस मीडिया लाईव्ह :

संगमनेर शहरातील मेन रोड वरील विशाल इलेक्ट्रॉनिकचे संचालक  सासरे अमीर इब्राहिम शेख व पती अतिक अमीर शेख रा.जोर्वेनाका संगमनेर या बाप- लेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, 

या दुक्कलीने संगमताने मिळून मुलाचे (अतिक) ४ विवाह करून पीता अमीर शेख हा आपल्या सख्या सूनांसोबत वाईट कृत्य करू पाहत असे व या कामात त्याचा मुलगा अतिक शेख त्याला मदत करत असे. त्यांच्या या घाणेरड्या कृत्यास आज ३ मुली बळी पडल्या आहे.त्यातील एका मुलीने या विरुद्ध सरळ पोलीस स्टेशन गाठले.

 या बाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील नाईकवाड पुरा येथील अतिक शेख यांचे लग्न झालेले होते.पाहिले लग्न झालेले असूनही याच्या परिवाराने पाहिले झालेले लग्न लपवून ठेवत दुसऱ्या मुलीशी अतिक शेख चे लग्न लावून दिले.सासरे अमीर शेख याने सुनेला शिवीगाळ करून धमकी देवून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले.व वेळोवेळी वाईट कृत्य करण्याचा प्रकार केला.ही घटना बुधवारी नाईकवाड पुरा येथे घडली.या बाबत सानिया अतिक शेख वय २१ हिने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.या फिर्यादीवरून पोलिसांनी अतिक अमीर शेख, अमीर इब्राहिम शेख,मन्सूर शेख  तिघे रा. नाईकवाडपुरा, संबुरा मोहसीन शेख,तसलिम फहीम शेख,अतिरा सद्दाम शेख यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 857/2022 भादवी कलम 489(A),504, 506, 323, 494,406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post