ससून रुग्णालयात न्युरोलॉजिस्ट नाहीत... वैद्यकीय मंडळाच्या दाखल्यासाठी मुंबईतील जे जे रुग्णालय येथे जावे लागते..


आम आदमी पक्षाच्या जाबानंतर अधिष्ठाता यांचे नेमणुकीचे व सुधारणेचे आश्वासन

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : ससून रुग्णालयात न्युरोलॉजिस्ट नाहीत... वैद्यकीय मंडळाच्या दाखल्यासाठी मुंबईतील जे जे रुग्णालय येथे जावे लागते. याबद्दल काल बै जी वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय याचे अधिष्ठाता डॉ काळे यांची आम आदमी पक्षाचे बिबवेवाडी विभाग समन्वयक घनशाम मारणे व कुमार धोंगडे यांनी भेट घेतली. त्यांना यास्थिती बद्दल अवगत करून परिस्थिती तातडीने सुधारण्याचे आवाहन केले. ससून सारख्या अतिशय महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये नियमित स्वरूपाचे न्यूरोलॉजिस्ट नसणे ही अतिशय शरमेची बाब आहे हे वैद्यकीय अधिष्ठातांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ काळे यांनी ही परिस्थिती तातडीने सुधारण्याचे आश्वासन दिले. लवकरच नियमित न्यूरोलॉजिस्ट ची नेमणूक केली जाईल तसेच दुर्धर आजार ग्रस्त रुग्णांना, शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय दाखला देण्याचे प्रलंबित काम वेगवान करण्यात येईल असेही आश्वासन दिले. 

सरकारी कर्मचारी एखाद्या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यास त्याला ससूनच्या वैद्यकीय स्थायी मंडळाचा दाखला अनिवार्य आहे. त्याखेरीज त्याला रजा व वेतन अदा केले जात नाही. त्यातच मेंदूचा व मज्जासंस्थेचा आजाराचा दाखला पुण्यातील प्रतिष्ठित ससून रुग्णालयामध्ये न्यूरोलॉजिस्ट नसल्याने मुंबईतील जे जे रुग्णालय येथून घ्यावा लागतो. सदर प्रकरणी रुग्णांचे त्यांच्या कुटुंबियांचे प्रचंड हाल होतात. एकीकडे आजारात दुखाचा डोंगर, दुसरीकडे वेतन रोखल्याने घरात पैसा नाही, तिसरीकडे सरकारी रुग्णालये डॉक्टर, कर्मचारी यांची हे अतिरिक्त काम असल्याने त्याकडे बघण्याचा बेफिकीर दृष्टिकोन. ह्या मुळे महिनोंमहिने सदर प्रकरणी रुग्णांना हेलपाटे मारावे लागतात. त्यातच दिव्यांग सेवकांचे हाल तर बघवत नाहीत. 

परंतु संवेदना शुन्य प्रशासनाला याचे कोणतेही देणेघेणे नसते.   व  या अश्या अनेक अर्थहीन कामाचा पाढा आम आदमी पक्षाच्या घनशाम मारणे यांनी अधिष्ठाता डॉ काळे यांच्यासमोर वाचला. दिव्यांग सेवकांची ह्या पुढील काळात अशी गैरसोय होणार नाही तसेच प्रलंबित दाखले तातडीने दिले जातील असे आश्वासन त्यांनी आपच्या शिष्टमंडळाला दिले. याची अंमलबजावणी झाल्यास यापुढे सदर बाबीचा लाभ सर्व दिव्यांग सरकारी सेवक, त्यांचे कुंटुबिय, तसेच सर्व सरकारी सेवकांना होणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post