मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विधाना विरोधात 'आप'ची निदर्शने

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे येथील एका सभेत बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आई वरून शिव्या देणे कोल्हापूरची पद्धत असल्याचे विधान केले. त्यांच्या या विधानाचे पडसाद कोल्हापुरात उमटले असून, या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे निदर्शने करण्यात आली. 

मंत्री पाटील यांनी बोलताना "एकवेळ आई वडिलांना शिव्या द्या, आई वरून शिव्या देणं ही कोल्हापूरची पद्धत आहे, पण मोदी-शहांवर बोलणं खपवून घेणार नाही" असं वक्तव्य केलं. आई-वडिलांचा व कोल्हापूरचा अपमान करणारे हे वक्तव्य आहे. अशा पद्धतीने कोल्हापूरला हिनावण्याचं काम चंद्रकांत पाटील यांच्याकडून वारंवार केलं जात आहे. 

कोल्हापूरची भाषा रांगडी आहे, परंतु आई-वडिलांचा व महिलांचा आदर करण्याचे संस्कार कोल्हापूरकरांवर आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा आम आदमी पार्टी निषेध करत आहे. चंद्रकांतदादा यांनी अशी बेताल वक्तव्ये थांबवली नाहीत तर त्यांना कोल्हापूरकरांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिला.

यावेळी उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, अभिजित कांबळे, विलास पंदारे, राज कोरगावकर, विजय हेगडे, शशांक लोखंडे, अमरसिंह दळवी, डॉ. कुमाजी पाटील, मयूर भोसले, रवींद्र ससे, रवींद्र राऊत, बसवराज हदीमनी, मंगेश मोहिते आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post