मोईन इनामदार यांची हिंगोली जिल्ह्यात समन्वयक पदी नियुक्ती

 देश भरात राहुल गांधी यांची "भारत जोडो यात्रा" अभियानासाठी     


प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरात सुरू केलेल्या 'भारत जोडो यात्रा" अभियानाच्या महाराष्ट्र मा.प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिणीस  पदाधिकारी मोईन इनामदार  यांची हिंगोली जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. मोईन इनामदार हे काँग्रेस पक्षात अनेक  पदावर काम केलेले आहे. तसेच काँग्रेसच्या विविध योजना जनसामान्य पर्यंत पोहचविले आहे.काँग्रेस पक्षासाठी एक निष्ठेने काम करणारे मोईन इनामदार केले आहे.

सदरील नियुक्ती ही अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खासदार इमरान प्रतापगडी यांच्या आदेशावरून करण्यात आली आहे.तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र निरीक्षक अहेमद खान यांच्या सिफारीशाने मोईन इनामदार यांना याबाबतचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. मोईन इनामदार यांनी इम्रान प्रतापगडी,अहेमद खान  काँग्रेसचे आमदार वजाहत मिर्झा यांच्या आभार मानले आहे.मोईन इनामदार यांच्या  निवडीबद्दल पक्षातील नासेर नजीर खान, डॉ जफर खान, काँग्रेसचे शहर अध्यक्ष शेख युसूफ,अनिस पटेल व मित्रपरिवारांने  अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post