गब्बर अॕक्शन संघटना महाराष्ट्राचा जनतेसाठी पुन्हा एकदा मैदानात चालू थकबाकीदार विद्युत ग्राहकांना व्याज माफ करा.

 मा. स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे, आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांच्या नावाने नवीन योजना कार्यान्वीत करावी- गब्बर अॕक्शन संघटना .


औरंगाबाद :  (अब्दुल कय्यूम ) :

गब्बर अॕक्शन संघटनेच्या वतिने आज जिल्हाधिकारी  औरंगाबाद यांच्या मार्फत  मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना तसेच महाराष्ट्र राज्याचे उर्जामंत्री सहव्यवस्थापक संचालक, महावितरण कार्यालय औरंगाबाद यांना सविनय सादर.

स्व. विलासराव देशमुख यांच्या नावे आजपर्यंत चालत आलेल्या अभय योजनेस 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. रास्त हेतू लक्षात घेवून मंत्रीमंडळाने यास मंजुरीही दिली आहे.

 गब्बर अॅक्शन कमिटीच्या वतीने निवेदन सादर करण्यात येते की, याच स्वरूपाची स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे , तसेच लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंढे यांच्या नावाने याच स्वरूपाची नवीन योजना कार्यान्वीत करावी, व या योजनेमध्ये चालु थकीत बीलामध्ये व्याज व विलंबाची रक्कम ही 100 टक्के माफ करण्यात यावी, केवळ मुळ रक्कम वसुल करावी अशी आमच्या संघटनेची मागणी केली आहे. गब्बर अॅक्शन कमिटी औरंगाबाद विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी  औरंगाबाद यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात येते की, महाराष्ट्रामधील जनता ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक संकटे झेलत झेलत आपले जीवन जगत आहे. त्यापैकी येथील जे लोकं झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास आहेत, तसेच काही कामगार, शेतमजुर, कष्टकरी, हमाल, मापाडी माती बांधकाम कामगार माथाडी कामगार, नाका कामगार आदी कामगारांचे आणि गरीब जनतेचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. खेदाने सांगावे वाटते की महाराष्ट्र प्रगतीपथावर जरी असला तरी येथील कामगार कष्टकऱ्याच अवस्था ही फार दयनीय आहे.

काही कामगारांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत नाही, यांचे कारण असे की, काही शासकीय कार्यालयातील दलाल जे राजकारणीलोकांच्या हाताखाली दलाली करतात, त्यांच्या मदतीने व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गरीबांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळून येत नाही. परिणामी त्यांची प्रगती वाढण्याऐवजी ते पुन्हा गरीबीकडेच वळलेले दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाने स्व. विलासराव देशमुख यांच्या नावे अभय योजना कार्यान्वीत केली होती. त्यामध्ये घरगुती वापरातील विज ग्राहकांना त्यांचे बील जर कायमस्वरूपी खंडीत केले असेल, त्यांची परिस्थिती पैसे भरण्यासारखी नसेल तर अशा वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी व त्यांना वीजपुरवठा सुरळीत मिळावा म्हणून ही योजना कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. आताच शासनाने त्यास पुन्हा मुदत वाढ दिलेली आहे. यामध्ये ग्राहकांना कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकित रक्कमेत सवलत देणारी ही योजना आहे. ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. योजनेत ग्राहकांनी थकबाकी मुळ रक्कम एकरकमी भरली तर त्याच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार हा 100 टक्के माफ करण्यात येतो, अशी असल्याने अनेक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता आलेला आहे. त्यामुळे ज्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. तो पुन्हा करण्यात आलेला आहे. नव्याने या योजनेच्या आधारे सुरळीत आमच्या संघटनेचे मत असे आहे की, मा. मुख्यमंत्री साहेब, आपण याच महाराष्ट्रात गोरगरीबांच्या कल्याणासाठी त्यांना सहाय्य मिळावे, यासाठी वरील प्रमाणे योजना या मा. स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे, आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांच्या नावे नवीन योजना कार्यान्वीत करावी, की ज्या योजनेमधून वरील सामान्य जनतेस दिलासा मिळेल. असे गब्बर अॅक्शन कमिटीचे रास्त मत आहे. संघटनेचे असे मत आहे की नव्याने याच धर्तीवर वरील नावे योजना सुरू करून त्यामध्ये चालु बिलामध्ये असलेले व्याज माफ करण्यात यावे, केवळ मुळ रक्कमच वसुल करण्यात यावी, अशी योजना कार्यान्वीत करावी, अशी संघटनेची आपणाकडे कळकळीची विनंती आहे.

करिता संघटनेच्या मागणीची योग्य ती दखल घेवून जनसामान्याना न्याय व दिलासा मिळेल अशा स्वरूपाची योजना तात्काळ कार्यान्वीत करावी व संघनेच्या निवेदनावर काय निर्णय कारवाई जी काय असेल ती करून संघटनेस पत्राद्वारे असे निवेदनात म्हणटले आहे.

यावेळी अध्यक्ष मकसुद अन्सारी,हफीज अली,अब्दुल कय्यूम हसन शाह,इम्रान पठाण,तय्यब जफर,ईस्माइल राजा,अब्दुल समद बागबान,दानिश अन्सारी,अशफाक बागबान,अनीस रामपुरे, एजे शेख,वसिम खान, कलीम बॉक्सर,सय्यद ईस्माइल,अब्दुल बासित,विलास मागरे,एड विकास खरात,प्रविण बुरांडे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post