अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूरप्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीनं कोठडी मिळालेल्या अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर कडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
जामीन मंजूर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, परीक्षेत उमेदवार मोबाईल वापरायचे. पेपरफुटीची प्रकरणं झाली होती. त्याविरोधात केलेल्या आंदोलनात संघर्ष झाला त्यातून माझ्यावर कलम ३५३ दाखल झालं. पण या प्रकरणी माझ्यावर गुन्हा कधी दाखल झाला समन्स कधी बजावलं हे देखील मला कळालं नाही आणि थेट कोठडी सुनावली. पण आता सेशन्स कोर्टानं मला जामीन मंजूर केल्यानं मी कोर्टाला धन्यवाद देतो.

Post a Comment

Previous Post Next Post