केंद्र सरकारने 'अत्यावश्यक' यादीतून 26 औषधं काढून टाकण्याचा निर्णय घेतलाप्रेस मीडिया लाईव्ह :

 दिल्ली : केंद्र सरकारने 'अत्यावश्यक' यादीतून 26 औषधं काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी अत्यावश्यक औषधांची सुधारित राष्ट्रीय यादी (NLEM) जारी केली.या यादीमध्ये 27 श्रेणीतील 384 औषधांचा समावेश आहे. यादीत समाविष्ट नसलेल्या औषधां मध्ये ही ranitidine चं नाव आहे.

अॅसिडिटी आणि पोटाशी संबंधित इतर आजारांसाठी ranitidine हे सहसा लिहून दिलं जातं. हेच औषध Rantac, Zinetac आणि Aciloc सारख्या वेगवेगळ्या ब्रँड नावाने विकलं जातं. पण, आता कॅन्सर होण्याच्या चिंतेमुळे ही औषधं अत्यावश्यक यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.

अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत इवरमेक्टिन, मुपिरोसिन आणि निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी यांसारख्या विशिष्ट संसर्गविरोधी औषधांसह 34 औषधांचा समावेश केल्याने, औषधांची एकूण संख्या आता 384 झाली आहे. यादीत समाविष्ट केलेली अनेक एंटीबायोटीक्स, लस आणि कॅन्सरविरोधी औषधं अधिक परवडणारी होतील.

रेनिटिडाइन, सुक्रॅफेट, व्हाईट पेट्रोलॅटम, एटेनोलॉल आणि मिथाइलडोपा यांसारखी 26 औषधं सुधारित यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. किंमत परिणामकारकता आणि उत्तम औषधांची उपलब्धता 'या' मापदंडांच्या आधारे ही औषधं यादीतून बाहेर काढण्यात आली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केलंय की, "आवश्यक औषधांची राष्ट्रीय यादी 2022 जाहीर झाली. त्यात 27 श्रेणीतील 384 औषधांचा समावेश आहे. अनेक एंटीबायोटीक्स, लस, कॅन्सरविरोधी औषधं आणि इतर अनेक महत्त्वाची औषधं अधिक परवडणारी बनतील आणि रुग्णांच्या खर्चात घट होईल."

छातीतील होणारी जळजळ तसंच ॲसिडिटीचा त्रास नाहीसा करणारं रॅन्टॅक हे औषध आता अत्यावश्यक सेवेतून वगळण्यात आलंय. अमेरिकेत या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीये. तर अमेरिकेनंतर आता भारतानेही या औषधांबाबतीत मोठा निर्णय घेतलाय. भारतीय आरोग्य मंत्रालयाने झेन्टॅक, रॅन्टॅक यांच्यासह एकूण 26 औषधांना अत्यावश्यक औषधांच्या यादीतून वगळलंय.

26 वगळलेल्या औषधांमध्ये हे समाविष्ट आहे:

 • Alteplase
 • Atenolol
 • Bleaching Powder
 • Capreomycin
 • Cetrimide
 • Chlorpheniramine
 • Diloxanide furoate
 • Dimercaprol
 • Erythromycin
 • Ethinylestradiol
 • Ethinylestradiol(A) Norethisterone (B)
 • Ganciclovir
 • Kanamycin
 • Lamivudine (A) + Nevirapine (B) + Stavudine (C)
 • Leflunomide
 • Methyldopa
 • Nicotinamide
 • Pegylated interferon alfa 2a, Pegylated interferon alfa 2b
 • Pentamidine
 • Prilocaine (A) + Lignocaine (B)
 • Procarbazine
 • Ranitidine
 • Rifabutin
 • Stavudine (A) + Lamivudine (B) 25. Sucralfate
 • White Petrolatum

Post a Comment

Previous Post Next Post