खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर मनपा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याचा इशारा दिला


प्रेस मीडिया लाईव्ह

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर मनपा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याचा इशारा दिला. महापालिकेतील कारभारावरून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहे .राज्यात आणि केंद्रात आमचे सरकार असून दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाईसाठी भाग पाडू, असा इशाराच त्यांनी बैठकीत दिला.कोल्हापूर शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

 बैठकीला मनपा प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडेही उपस्थित होत्या. यावेळी धनंजय मडाहिक म्हणाले, की नगररचना, घरफाळा, आरोग्य विभागातील तक्रारी अधिक आहेत. माजी नगरसेवकांनी या संदर्भात आवाज उठवला असून त्याची नोंद घेत चौकशी करावी.या बैठकीमध्ये जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी अमृत योजनेच्या कामाची माहिती दिली.

दरम्यान, धनंजय महाडिक यांनी केंद्र आणि राज्यात केंद्राची सत्ता असल्याचे सांगत पालिकेसाठी निधी आणणे शक्य असल्याचे सांगितले. त्यामुळे निधीसाठी मनपा प्रशासनाने प्रस्ताव द्यावा, असे ते म्हणाले.

खासदार धनंजय महाडिक यांनी हद्दवाढीवर बोलताना अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, शहराची हद्दवाढ न झाल्याने राज्य आणि केंद्राकडील योजनांचा लाभ घेता येत नाही. काही योजनांचा निधी महापालिकेला मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊन शहराची हद्दवाढ झाली पाहिजे. शहरात येण्याचे फायदे त्यांना समजावून सांगितले पाहिजेत. हद्दवाढीसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post