नवरात्रीनिमित्त जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेची महिलांसाठी विशेष भेट, नऊ दिवस मोफत थायरॉईड टेस्ट तपासणी



प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील


 नवरात्रीनिमित्त विविध मंडळांमार्फत नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत यावर्षी श्रीक्षेत्र पंचायत मंदिर नढाळ, चौक येथे नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी संस्थेच्या माध्यमातून पनवेल, नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी परिसरातील महिलांसाठी जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि दिपक क्लिनिकल लॅब्रोटरी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत थायरॉईड टेस्टचे आयोजन 26 सप्टेंबर 2022 ते 4 ऑक्टोबर 2022 या दिवसात सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत दिपक क्लिनिकल लॅबोरेटरी, शॉप नंबर 4 वास्तु श्री सोसायटी, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल समोर, पनवेल येथे आयोजित केले आहे.

         यावेळी तपासणी करणाऱ्या सर्व महिलांना विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे अध्यक्ष असलेल्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून एक सेवाकार्ड भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्यामध्ये 50% टक्‍यांपर्यंत सवलतीच्या दरात रक्ततपासणी, उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल निराधार गरजू रुग्णांना मोफत फळ सेवा, माफक दरात एक्स-रे, O.P.G., E.C.G. सेवा, मोफत E-श्रम कार्ड नोंदणी, विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन, ना नफा,ना तोटा" तत्त्वावर रुग्णवाहिका सेवा या सेवेचा लाभ महिला आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य घेऊ शकतात अशी माहिती दिली प्रितम म्हात्रे यांनी दिली. तपासणी करीता व अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक 9326050505 / 8334050505 / 7769050505 / 8542050505 या वर संपर्क साधावा.

कोट

यावर्षी सुद्धा आमच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आम्ही महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने नऊ दिवस हा "आरोग्य उत्सव" साजरा करण्याचे नियोजन माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण या त्यांच्या शिकवणीमुळे आमच्या संस्थेचे सर्व सभासद नेहमीच आरोग्य,शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात. हा नवरात्रीचा आरोग्य उत्सव सुद्धा त्याचाच एक भाग आहे:- प्रितम जनार्दन म्हात्रे, अध्यक्ष जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था-मा. विरोधी पक्षनेते प.म.पा.

Post a Comment

Previous Post Next Post