मुसळधार पावसाचा पुण्याला चांगलाच दणका..

 पुण्यात झाड कोसळून एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर .

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : काल झालेल्या दमदार पावसाने पुण्यात झाड कोसळून एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यात पावसाने अचानक जोर धरल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसाचा पुण्याला चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. 

पुण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली तर रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहत आहेत. जोरदार पाऊस झाल्याने पुण्यातील विविध भागांमध्ये झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. नाना पेठ, चमडी गल्ली येथे तर मुसळधार पावसाने गाड्या पडल्या असून पावसाचा जोर वाढला तर त्या वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसामध्ये नागरिकांनी एका ठिकाणी थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रस्ता पेठ कल्याणी नगर, स्वारगेट, बालाजी नगर, धनकवडी, कात्रज, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसाचा कोल्हापूरलाही मोठा फटका बसल्याचे यला मिळत आहे. जोरदार पावसामुळे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर सव्वाशे वर्षाचे वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर सव्वाशे वर्षाचे वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post